Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price : जिंतूर बाजार समितीत कापसाला उच्चांकी दर; साडेसात हजारांचा दर मिळाल्याने शेतकरी आनंदी

Parbhani News : शेतकऱ्यांनी कापूस वेचणी सुरु केल्यानंतर कमी प्रमाणात कापूस निघत आहे. तुलनेत सुरवातीला कापसाचा दर देखील सहा ते साडेसहा हजार रुपये मिळत होता.

राजेश काटकर

परभणी : यंदाच्या हंगामात अति पावसामुळे कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे यंदा उत्पदनात घट होण्याची शक्यता आहे. कापूस काढणी झाल्यानंतर शेतकरी विक्रीसाठी नेत आहेत. यात परभणीच्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उच्चांकी दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

खरीप हंगामात यंदा कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र यंदा पाऊस देखील अधिक प्रमाणात झाला. यामुळे कापसाचे पीक पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. (Cotton Price) शिवाय चांगली फुल धारणा न झाल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी कापूस वेचणी सुरु केल्यानंतर कमी प्रमाणात कापूस निघत आहे. तुलनेत सुरवातीला कापसाचा दर देखील सहा ते साडेसहा हजार रुपये मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. मात्र आता (Jintur) जिंतूरमध्ये चांगला दर मिळत आहे. 

चांगला दर मिळत असल्याने विक्रीही वाढली 

परभणीच्या (Parbhani) जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला साडे सात हजारांचा उच्चांकी दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस विक्रीसाठी जिंतूर बाजार समितीत आणायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी कापूस लिलावास आणतेवेळी काडी-कचरा विरहीत आर्दता कमी असलेला कापूस विक्रीसाठी आणावा; असे आवाहन बाजार समितीने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT