Farmer Crop Loan Saam tv
ऍग्रो वन

Farmer Crop Loan : परभणी जिल्हातील दीड लाख शेतकऱ्यांना पीक कर्ज

Parbhani News : पाच वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक संकटाचा सामना करत आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांसह इतर बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले जाते.

राजेश काटकर

परभणी : बी- बियाणे खरेदीसाठी पैसा उपलब्ध व्हावा; या प्रमुख हेतूने जिल्हा प्रशासनाकडून बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात येते. परंतु, मागील काही वर्षांपासून या बँकांकडूनl प्रशासनाच्या उद्दिष्टाला खो देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. (Parbhani) परभणी जिल्ह्यातील ५८ टक्के उद्दिष्ट गाठत दीड लाख (Farmer) शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. (Tajya Batmya)

पाच वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक संकटाचा सामना करत आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांसह इतर बँकांना पीक कर्ज (Crop Loan) वाटपाचे उद्दिष्ट दिले जाते. २०२३-२४ या वर्षात खरीप हंगामात जिल्ह्यातील व्यावसायिक, खाजगी, महाराष्ट्र ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती (Bank) बँकांच्या शाखांना १ हजार ३८४ कोटी १७ लाखांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, बँकांनी केवळ १ लाख ४ हजार १५८ शेतकऱ्यांना ८३८ कोटी ४२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. ज्याची टक्केवारी ही केवळ ६०.५७ टक्के एवढी आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रब्बी हंगामातही ५८ टक्केच वाटप 

परभणी जिल्ह्याकरिता २०१३- २४ या वर्षात देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार बँकांकडून खरीप हंगामात जिल्ह्यात ६०.५७ टक्के कर्ज वाटप करण्यात आले होते. तर रब्बी हंगामात ५८.११ टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठले आहे. अर्थात तब्बल ४० टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळू शकला नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udgir Fort History: मध्ययुगीन युद्धभूमी आणि भव्य संरचना, उदगीर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Solapur : सोयाबीनच्या बीलापोटी मिळालेला चेक बँकेत भरल्यानंतर चोरीला; दुसऱ्याच खात्यावर वटला ४ लाखाचा चेक

Sshura Khan : खान कुटुंबाची सून शूरा आहे तरी कोण? वाचा Unknown Facts

Pune Traffic Protest : चाकणपेक्षा गुजरात बरा! वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उद्योजक रस्त्यावर उतरले

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजप आणि शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT