Electricity Theft : चार वर्षांपासून वीज चोरी; ५७ हजार युनिट विजेचा अनधिकृत वापर

Parbhani News : वीज मीटरमध्ये छेडछाड करून मीटर बंद केले जाते. यानंतर वीज चोरी केली जते.
Electricity Theft
Electricity TheftSaam tv
Published On

परभणी : महावितरणकडून अधिकृत वीज कनेक्शन घेऊन विजेचा वापर करणे योग्य आहे. मात्र मीटरमध्ये छेडछाड करून विजेची चोरी (Electricity Theft) अनेकजण करत असतात. असाच प्रकार परभणीमध्ये (Parbhani) उघडकीस आला असून मागील चार वर्षांपासून विजेची चोरी असून तब्बल ५७ हजार युनिटची वीज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. (Breaking Marathi News)

Electricity Theft
Shirur Crime : शेजारील घराला कुलूप लावून टाकला दरोडा; दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी

परभणी महावितरण कार्यक्षेत्रात हा प्रकार समोर आला आहे. अधिकृत मीटर घेऊन देखील वीज चोरी केली जात होती. वीज मीटरमध्ये छेडछाड करून मीटर बंद केले जाते. यानंतर वीज चोरी केली जते. अशाच प्रकारे गेल्या चार वर्षांपासून वीज मीटरमध्ये छेडछाड करून एकूण ५७ हजार १०२ युनिट वीज चोरी केल्याचा प्रकार समोर आला. (Mahavitaran) महावितरणकडून करण्यात आलेल्या तपासणीत हा प्रकार समोर आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Electricity Theft
Akkalkuwa Accident : देवीच्या दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; दोघांचा मृत्यू, १७ भाविक जखमी

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 

महावितरणने केलेल्या या कारवाईत ५७ हजार युनिट विजेचा वापर अनधिकृतपणे करण्यात आल्याचे समोर आले आहे. या वरून नानलपेठ पोलिस ठाण्यात अनधिकृतपणे वीज चोरी करून महावितरण कंपनीचे १७ लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चौकशी सुरु करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com