Cotton Price At Parbhani Market Yards Cotton Price - Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price: पहिल्याच दिवशी कापसाला विक्रमी दर; परभणी मार्केट यार्डात कापूस खरेदीस प्रारंभ

Parbhani News : कापूस दर वाढीच्या अपेक्षेने मागीलवर्षी शेतकऱ्याने कापूस घरात साठवून ठेवला होता. मात्र दर न वाढल्याने हा कापूस यंदा कमी दरात विकावा लागला

राजेश काटकर

Cotton Price At Parbhani Market:

मागील वर्षी कापूस दर वाढीची असलेली अपेक्षा बंग झाली होती. यामुळे यंदा कापसाला किती भाव (Cotton Price) राहील याबाबत अजूनही सांगणे कठीण आहे. अनेक ठिकाणी कापसाला ७ हजार रुपयांच्यावर दर मिळत असून (Parbhani) परभणीच्या सुरु झालेल्या कापूस खरेदीनंतर पहिल्याच दिवशी विक्रमी दर मिळाला आहे. यामुळे शेतकरी आनंदीत आहे. (Maharashtra News)

कापूस दर वाढीच्या अपेक्षेने मागीलवर्षी शेतकऱ्याने कापूस घरात साठवून ठेवला होता. मात्र दर न वाढल्याने हा कापूस यंदा कमी दरात विकावा लागला. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यात यंदा पावसाच्या लहरीपणामुळे कापसाच्या उत्पन्नात घट झाली आहे. शिवाय चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. काही (Farmer) शेतकरी शेतातून कापूस काढल्यानंतर लागलीच कापसाची विक्री करत आहेत. त्यानुसार आज परभणी मार्केट यार्डात आज कापूस विक्रीसाठी आणला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

७५११ मिळाला दर
परभणीत बाजार समितीच्या टीएमसी यार्डात आजपासून कापूस खाजगी व्यापाऱ्यामार्फत जाहिर लिलावाद्वारे कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणतेवेळी ओला कापूस न आणता स्वच्छ आणावा; असे आवाहन बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांनी केला आहे. ठाकरे गटाचे खासदार उपनेते संजय जाधव यांच्या हस्ते कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. कपासीला पाहिल्याच दिवशी सात हजार पाचशे अकरा रुपायांचा दर  मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: फक्त ३ दिवसांत स्किन होईल सॉफ्ट आणि ग्लोईंग; आजच ट्राय करा 'हा' घरगुती फेसपॅक

तुम्हीही प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय? तर आत्ताच व्हा सावध! शरीरावर होऊ शकतात ५ गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

आमदार विकून मुख्यमंत्रिपद दिलं अन् त्याला लोकशाही म्हणता?; कपिल सिब्बल भडकले,आयोगाची कोंडी, युक्तिवादाचा शब्द ना शब्द

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन! शाळांना सुट्टी जाहीर, कार्यक्रम रद्द; राजकारणात शोककळा

SCROLL FOR NEXT