Parbhani News Saam tv
ऍग्रो वन

Parbhani News : जिंतूर तालुक्याला १०८ कोटींची मदत; ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीचा बसला होता फटका

Parbhani News : परभणी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

राजेश काटकर

परभणी : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात राज्यातील जवळपास सर्वच भागात अतिवृष्टी झाली होती. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान परभणी जिल्ह्यात देखील अतिवृष्टीचा फटका बसला होता. यात जिंतूर तालुक्याला अतिवृष्टीची सर्वाधिक १०८ कोटींची मदत मिळणार आहे. मदतीच्या रकमेतून इतर वसुली न करण्याचा आदेश देण्यात आले आहेत.  
 

परभणी (Parbhani) जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी शासनाने ५४८.५९ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. (Heavy Rain) यात जिंतूरला सर्वाधिक १०८.८७ कोटी रुपये मिळणार आहेत. या अहवालानुसार परभणी जिल्ह्याला तब्बल ५४८.५९ कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे. लवकरच ही मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. 

ही मदत डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणे, त्यावरून ई- केवायसी करणे या प्रक्रियांना पुन्हा एकदा सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये जिरायत, बागायती पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मर्यादेतच मदत वाटप होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ३ दिवसांपासून शिंदे शहांच्या दारात, शिवसेना नावाला कलंक लावला - संजय राऊथ

Government Job: समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

David Warner: डेव्हिड वॉर्नरवरील लाईफटाईम बॅन हटवला! आता कर्णधार होण्यासही सज्ज

NCP Ajit Pawar : अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर; सात नावांचा समावेश

Armaan Malik: युट्युबर अरमान मलिकने केलं चौथं लग्न? करवा चौथच्या त्या व्हिडीओमुळे एकच चर्चा

SCROLL FOR NEXT