Pandharpur Sangola News Saam tv
ऍग्रो वन

Pomegranate : सांगोल्यात ३० हजार हेक्टरवरील डाळिंब बागा उध्दवस्त; शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान

Pandharpur Sangola News : नुकसानीसंदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज मंजूर करण्यासाठी प्रयत्न

भारत नागणे

पंढरपूर : विविध देशांत सर्वाधिक डाळिंबाची निर्यात पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातुन केली जात असते. मात्र डाळींब बागेला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. यामध्ये सर्वाधिक फटका डाळिंब शेतीला बसला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे तालुक्यातील सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील डाळिंबा बागा उध्दवस्त झाल्या आहेत. यात विविध देशात निर्यातीसाठी तयार करण्यात आलेल्या डाळिंब बागांचाही समावेश आहे.

सांगोला तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. या सततच्या पावसामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. तर दोन दिवसांपूर्वी पुन्हा पावसाने झोडपून काढले. यावेळी शंभर वर्षांच्या इतिहासामध्ये कधी झाला नाही असा एका दिवसात सुमारे १६० ते १७० मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. या पावसामुळे हजारो हेक्टर वरील डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. 

सांगोल्यातून अनेक देशात निर्यात  

तेल्या, मर, खोडकिड या सारख्या किड रोगांचा डाळिंब बागांवर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. हातातोंडाशी आलेला खास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे अनोनात असे नुकसान झाले आहे. दरवर्षी सांगोल्यातून इराण, इराक, कुवेत, सौदेअरेबिया, बांग्लादेश, चीन, नेपाळ यासह अनेक देशांमध्ये डाळिंबाची हजारो टन निर्यात केली जाते. त्यातून कोट्यावधी रुपये येथील डाळिंब उत्पादक शेतकर्यांच्या हातात येतात. यंदामात्र अतिवृष्टी आणि पूराने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे.

१ कोटी रुपयांचे नुकसान 
दरम्यान सांगोला तालुक्यातील कडलास, सोनंद, अकोला, जवळा, मंगेवाडी या भागाला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील सुमारे ५५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेली आहेत. यामध्ये सर्वाधिक सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील डाळीब बागांचा समावेश असून येथील शेतकर्यांचे सुमारे एक हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. डाळींब उत्पादक शेतकर्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने हेक्टरी एक लाख रूपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी निर्यातक्षम डाळिंब उत्पादक शेतकरी व भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा

Prasad Oak: 'शंभर चित्रपटांचा टप्पा गाठणं...'; 'वडापाव'च्या निमित्ताने प्रसाद ओकच्या चित्रपटांची 'शतकपूर्ती', अभिनेता म्हणाला...

India Vs Pakistan Match: ठाणे येथील हॉटेलमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा, भारत-पाक मॅच सुरू असताना टीव्ही फोडले; पाहा VIDEO

'१० मिनिटांत तयार हो, तुझ्यासोबत शरीरसंबंध..' CMOकडून महिला डॉक्टरवर जबरदस्ती, शेवटी हार्ट अटॅकनं मृत्यू

Navratri Upvas: नवरात्रीचा उपवास कधी सोडावा?

SCROLL FOR NEXT