Akola News Updates, Vidarbha News Updates अरुण जोशी
ऍग्रो वन

पश्चिम विदर्भातील ८८ हजार हेक्टरमधील संत्र्याला उष्माघाताचा धोका

सध्या दिवसाचे तापमान ४२ अंशांवर गेले आहे.

अरुण जोशी

अमरावती - यंदाचा उन्हाळा सर्वाधिक उष्ण राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविली आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेला विदर्भातील संत्रा पुन्हा संकटात सापडला आहे. संत्राची काही भागात आंबियाची गळ होत आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील ८८,८४८ हेक्टरमधील संत्रा बागांमध्ये व्यवस्थापन नसल्यास उन्हाच्या दाहकतेमुळे किमान १०० कोटींचा फटका संत्रा उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे. सध्या दिवसाचे तापमान ४२ अंशांवर गेले आहे. (Akola News Updates)

हे देखील पहा -

अद्याप मे व जून शिल्लक आहे. उष्ण तापमानामुळे संत्रा, मोसंबी, लिंबू फळबागांमध्ये कोवळी नवती करपणे, आंबिया बहराच्या लहान फळांची गळ, खोड तडकणे, झाडे निस्तेज दिसणे, नवीन कलमांमध्ये मर, कोवळ्या रोपांचे शेंडे वाळणे, पाने गळणे, आदी दुष्परिणाम दिसू लागले आहेत. तर या उन्हापासून संत्रा झाडावर टिकवने कठीण झाले असून संत्रा गळ मोठ्या प्रमाणावर होत आहे अशी प्रतिक्रिया अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील संत्रा उत्पादक शेतकरी सुधीर वानखडे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: फुगा फुगवताना फुटला, श्वसननलिकेत तुकडा अडकला; १३ वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू

Maharashtra Live News Update: बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांची धरपकड

Suraj Chavan Video : सासुरवाडीत सूरज चव्हाणचा स्वॅग; हटके स्टाइलमध्ये घेतलं बायकोचं नाव, उखाणा होतोय व्हायरल

Original vs Fake Charger: खरा अन् बनावट चार्जर कसा ओळखाल? वाचा सोपी ट्रिक्स

School Holiday: मोठी बातमी! ८ ते १४ डिसेंबर; राज्यातील शाळांना आठवडाभर सुट्टी; कारण काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT