Nashik , Onion Price, Farmers, satana bazar samiti saam tv
ऍग्रो वन

Onion Price : कांद्याला बोली लागली अन् मिळाला अवघा सव्वा रुपया; शेतकऱ्यांची क्रूर थट्टा थांबणार कधी ?

कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत अडकत चालला आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik : सटाणा बाजार समितीत (Satana Market Committee) कांद्याला अवघा सव्वा रुपये किलो भाव मिळाला. त्यामुळे चार पैशांचा फायदा तर सोडाच उलट खिशातून वाहतूक खर्च देण्याची वेळ शेतकऱ्यावर (farmer) आली. एकीकडे अस्मानी तर दुसरीकडे सुलतानी संकट कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा (onion growers) पिच्छा सोडायला तयार नसल्याने शेतकरी हवालदिल झालेत. (Maharashtra News)

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे लागलेलं अस्मानी आणि सुलतानी संकटांचं शुक्लकाष्ठ काही संपण्याच नाव घेत नाहीये. मागील २ महिन्यांपासून कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यानं शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलेले असतांनाच आता यावर कडी म्हणजे बाजारात कांदा विकून हाती चार पैसे येण्याऐवजी उलट शेतकऱ्याला भाड्यापोटी खिशातून पैसे देण्याची वेळ आलीय.

सटाणा बाजार समितीत सुभाष अहिरे या शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति किलो अवघा सव्वा रुपये भाव मिळाला. अहिरे यांनी ५ क्विंटल १० किलो कांदा बाजारात विक्रीसाठी नेला होता. मात्र कांद्याला बोली लागली ती अवघे सव्वा रुपये किलोची. संपूर्ण कांदा विकून त्याचे ६३७ रुपये आणि त्यातून भाडेपट्टी कपात करून त्यांना ५६९ रूपये ८५ पैसे हिशोबपट्टी मिळाली. त्यामुळे त्यांना खिशातून १३१ रुपये वाहतूक खर्च द्यावा लागला. (Tajya Batmya)

बाजारात कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव तर दुसरीकडे मागील २ आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडून ठेवलंय. त्यात कांद्याचे भाव आणखी पडल्यानं उत्पादन खर्च तर सोडाच उलट खिशातून शेतकऱ्यांना वाहतूक खर्च द्यावा लागण्याची वेळ आल्यानं शेतकऱ्यांची ही क्रूर थट्टा थांबणार कधी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

- ५ गुंठे कांदा लागवड ते काढणी खर्च ८ हजार.

- मिळालेले प्रत्यक्ष उत्पादन ५ क्विंटल १० किलो गोल्टी कांदा.

- वाहनात कांदा भरणे आणि विक्रीसाठी वाहतूक असा एकूण ९०० रूपये खर्च.

- काढणी ते विक्रीपर्यंत खर्च एकूण खर्च ८,९०० रूपये.

- बाजार समितीत विक्रीनंतर हाती आलेले उत्पन्न ५६९ रूपये ८५ पैसे.

- झालेला निव्वळ तोटा ८ हजार ३३० रूपये १५ पैसे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : महाराष्ट्रात घराणेशाहीचा पराभव; महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर PM नरेंद्र मोदी काय म्हणाले?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

SCROLL FOR NEXT