ठेकेदाराची एक चूक अन् शेतकऱ्याचं दोन लाखांचं नुकसान गजानन भोयर
ऍग्रो वन

ठेकेदाराची एक चूक अन् शेतकऱ्याचं दोन लाखांचं नुकसान

दीड एकर पपई फळबागेचे दोन लाखांचं नुकसान झाले आहे.

गजानन भोयर

वाशिम: अकोला- मंगरुळपीर एन एच 61 या सिमेंट रोडचे काम पूर्ण झाले आहे. मात्र ठेकेदाराने रोडच्या साईट च्या नाल्या काढल्या नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन नुकसान होत आहे. मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथिल शेतकरी प्रकाश राऊत यांच्या शेतात पाणी शिरल्याने शेतातील सुपीक मातीही खरडुन गेली असुन झाडाच्या मुळ उघडे पडले आहेत. दीड एकर पपई फळबागेचे दोन लाखांचं नुकसान झाले आहे.

सिमेंट रोडचे काम सुरू असताना रोडच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ठेकेदाराने धुरे व आऊटलेट दुरुस्त केले नाही. त्यामुळे शेतात पाणी जाऊन पपई फळबागेचे नुकसान झाले आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग अभियंता तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई ची मागणी केली मात्र अजून कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळं जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकरी प्रकाश राऊत यांनी केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil : एक लाजरा न्‌ साजरा मुखडा...; गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात सुंदर लूक, फोटो तुम्हीही पाहाल तर...

Maharashtra News Live Update: विमान प्रवासाच्या मनमानी विमान तिकीट दरांना लगाम लागणार

Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ

Monsoon Update : वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस! १३ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

SCROLL FOR NEXT