Solapur News Saam Tv
ऍग्रो वन

'ब्रदर डे'च्या पूर्वसंध्येला भावांना कंटाळून शेतकऱ्यानं घेतलं विष

ममदापूरमधील घटना; पोलिसांच्या हाती सुसाईड नोट

विश्वभूषण लिमये

सोलापूर - शेताच्या वाटेच्या कारणावरून २ भावांमध्ये वारंवार होणाऱ्या शिवीगाळ आणि त्रासाला कंटाळून विषारी औषध पिऊन तरुण शेतकऱ्याने (Farmer) आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांना (Police) त्याच्याजवळ सुसाईड नोट मिळाली आहे. मारुती तावस्कर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून ही घटना बार्शी तालुक्यात ममदापूर शिवारात घडली.

हे देखील पाहा -

याप्रकरणी पत्नी रोहिणी मारुती तावसकर यांनी फिर्याद दिली आहे. चिठ्ठीत भावंडाच्या त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे. मारुतीच्या आत्महत्येनंतर पंचनामा करताना खिशामध्ये स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठी आढळली.

भावंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत आरोपी चुलत भाऊ अनिल शिवलिंग तावसकर, दिगंबर शिवलिंग तावसकर, चुलती कालिंदा शिवलिंग तावसकर, सख्खा भाऊ खंडू शंकर तावसकर यांच्या विरोधात पांगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीचा मोर्चा- वर्षा गायकवाड

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

Seasonal Fruits : कोणत्या हंगामात कोणती फळे खावी? ९९% लोक करतात 'ही' १ चूक

ATM Robbery : नाईटी, मास्क घालून आले अन् SBI चं एटीएम फोडले; २५ लाख घेऊन चोर पसार, CCTV पाहून पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT