Nashik Distric Bank Saam tv
ऍग्रो वन

Nashik Distric Bank : कर्जमाफी नसल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून थकीत कर्जफेड

Nashik News : विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर अद्याप कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही. सध्याच्या परिस्थितीत राज्य सरकार कर्जमाफी करण्याच्या मूडमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : शेतीसाठी घेतलेल्या पीक कर्जाचा बोजा शासनाकडून कर्जमाफीच्या निर्णयाने कमी होईल; अशी आशा शेतकऱ्याला लागून होती. मात्र कर्जमाफी देण्यात येणार नसल्याचे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. यामुळे आता शेतकऱ्याने बँकेकडे कर्जफेड करण्यास सुरवात केली आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर अद्याप कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही. त्यातच सध्याच्या परिस्थितीत राज्य सरकार कर्जमाफी करण्याच्या मूडमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्जमाफी होणार अशी आशा ठेवून असलेल्या बळीराजा हताश झाला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा बँकेच्या थकीत कर्जफेडीला सुरुवात झाली आहे.

शेतकऱ्यांचा स्वतःहून पुढाकार 

कर्जमाफी होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हा बँकेच्या वेगवेगळ्या केंद्रांवर जाऊन कर्जफेड सुरू केली आहे. मागील तीन- चार दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक शेतकरी आपल्या पीककर्जाची परतफेड करताना दिसत आहेत. सरकारकडून कर्जमाफीबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांनी स्वतःच कर्जाची जबाबदारी उचलण्यास सुरुवात केली आहे. 

अडचणीत असलेल्या बँकेला दिलासा 

कर्जदार कर्जाची फेड करत असल्यानं आर्थिक अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांकडून कर्जफेड होत असल्याने बँकेच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर किती कर्जदार शेतकऱ्यांनी किती कर्जफेड केली, हे पुढील २-३ दिवसांत स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat: मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

Maharashtra News Live Update: भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर

पुढच्या आठवड्यात बारावीचा निकाल, दहावीच्या रिझल्टवरही अपडेट, mahresult.nic.in वर पाहा

TB cases Maharashtra: पुणे, नाशिक ते कोल्हापूर, नागपूरसह ११ हजार गावात टीबीचा विळखा, काय काळजी घ्याल? वाचा लक्षणं

Homemade Hair Mask Tips: उन्हामुळे केस कोरडे पडलेत? 'हे' 3 होममेड हेअर मास्क लावा, सिल्की आणि शायनी होतील तुमचे केस

SCROLL FOR NEXT