Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News: अवकाळी पावसाचा फटका; २ महिने उलटूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही

अवकाळी पावसाचा फटका; २ महिने उलटूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या (farmer) हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. मात्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत (Nandurbar) जाहीर केली जाईल; अशी घोषणा करण्यात आलेली होती. परंतु दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून देखील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे. (Tajya Batmya)

नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू आणि मका पिकाच्या प्रचंड नुकसान झालं होतं. तर या नुकसानीचे पंचनामे शासनाकडून त्वरित करण्यात आलेले होते. परंतु दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून देखील तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजूनही मिळालेले नाही. त्यामुळे खरीप हंगामाची तयारी शेतकरी कसे करणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मदत मिळाली तरच खरीपाची तयारी

सरकार एकीकडे शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा करत आहे. परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यवधी खर्च करत आहेत. मात्र खऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ कधी दिला जाणार आहेत. रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या वाया गेला. त्यामुळे आता खरीप हंगामावर शेतकऱ्यांची आशा लागली आहे. मात्र शासनाकडून वेळेत मदत मिळाली, तर खरीप हंगामाची तयारी करता येणार असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

दाद मागावी कुठे

सरकार शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत आहेत. परंतु शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मदत नेमकी कुठे थांबली आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तर या विषयावर कुठलाही अधिकारी बोलण्यास तयार नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता कोणाकडे दाद मागावी; असा संभ्रम शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT