Soyabean Price Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Price : नंदुरबार जिल्ह्यात सोयाबीनची आवक वाढली; भाव पोहचले साडेचार हजारांवर

Nandurbar News : मागील खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन घेतल्यानंतर मार्केटमध्ये अपेक्षित दर नव्हता. शेतकऱ्याने लावलेला खर्च देखील यातून निघणार नव्हता.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : सोयाबीन पिकाचे उत्पन्न घेतल्यानंतर मार्केटमध्ये अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करून ठेवली होती. आज ना उद्या सोयाबीनचे भाव वाढतील या उद्देशाने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन घरातच साठवून ठेवले होते. मात्र आता नवीन हंगामासाठी पैशांची गरज असल्याने सोयाबीन विक्रीसाठी आणला जात असल्याने मार्केटमध्ये आवक वाढली आहे.

मागील खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन (Soyabean Price) घेतल्यानंतर मार्केटमध्ये अपेक्षित दर नव्हता. शेतकऱ्याने लावलेला खर्च देखील यातून निघणार नव्हता. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची घरातच साठवणूक करून ठेवली होती. भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्याला होती. मात्र आता नवीन (Nandurbar) खरीप हंगामाला सुरवात झाल्यानंतर देखील सोयाबीनच्या दरात हवी तशी वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत नाही. तरी देखील काही शेतकरी आता सोयाबीन विक्रीसाठी मार्केटमध्ये आणत आहेत. 

भाव अजूनही वाढलेले नाहीत किमान ५ हजार रुपये भावाची अपेक्षा असली तरी आता खरीप हंगामात पेरणीसाठी पैशांची अडचण निर्माण झाल्यामुळे सोयाबीन विक्रीसाठी काढला आहे. सध्या मार्केटमध्ये सोयाबीनला साडेचार हजार इतकाच भाव आहे. मात्र नाईलाजास्तव काही शेतकरी घरात साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी काढत आहेत. त्यामुळे शहादा बाजार समितीत रोजचे ५० ते ६० क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

6,6,6,6,6,6,6,6...षटकारांचं वादळ, 11 चेंडूत ८ षटकार; युवा फलंदाजाचा विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT