Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : काही भाग दुष्काळाच्या यादीतून वगळल्याने शिवसेना आक्रमक; रस्त्यावर उतरण्याच्या दिला इशारा

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर करावा अन्यथा शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: यंदा राज्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुसार राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र अनेक भाग दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आला आहे. (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यात देखील काही भाग वगळला आहे. या कारणाने उद्धव ठाकरे शिवसेना (Shivsena) आक्रमक झाली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Live Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात सुरुवातीला पाऊस पडला. मात्र मध्यंतरी मोठा खंड पडला होता. तर शेवटी काही प्रमाणावर पाऊस पडला. त्यामुळे सुरुवातीला आणि शेवटी पडलेला पावसामुळे शासनाने नंदुरबार जिल्ह्याकडे दुर्लक्ष केलं आहे. जिल्ह्यात आतापासूनच पाण्यासाठी टँकरची गरज पडत आहे, मग दुष्काळ का नाही? नंदुरबार जिल्ह्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर करावा अन्यथा शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही; असा इशारा आमदार आमाशय पाडवी यांनी दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, शहादा आणि तळोदा या तालुक्यातील काही मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. परंतु अनेक भागात अजूनही दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना देखील शासनाने दुष्काळ जाहीर केलेला नाही. सरकार फक्त गाजावाजा करत असल्याचे काम करत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने कुठेही उभी राहत नसल्याच्या आरोप ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Control Drinks: डायबिटीज कायम नियंत्रणात ठेवायचाय? आजपासून डाएटमध्ये आवर्जून प्या 'हे' ३ हेल्दी ज्यूस

Pune: चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फुटणार; पुणे मेट्रो ५०८ मीटर लांबीचा फुट ओव्हर ब्रिज उभारणार

Homemade Face Pack : काळे डाग, पिंपल्स आठवड्याभरात होतील छुमंतर; चेहऱ्यावर लावा 'हा' फेसपॅक

Maharashtra Live News Update: पनवेल मधील सेक्टर ४ मध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू

Barshi : बार्शीतील व्यापाऱ्याची प्रामाणिकता; ज्वारीच्या पोत्यात सापडलेलं चार तोळे सोनं केलं परत

SCROLL FOR NEXT