Unseasonal Rain Saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain : ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका; अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम पूर्णतः वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण आशा रब्बी हंगामावर आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : हवामान खात्याने आगामी काही दिवसात नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. शिवाय (Nandurbar) जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. यामुळे (Farmer) शेतकरी चिंतेत पडला आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम पूर्णतः वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण आशा रब्बी हंगामावर (Rabi Crops) आहे. मात्र पूर्वी दुष्काळ सदृश्य परिस्थिती त्यानंतर मध्यंतरी आलेला अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली होती. मात्र आता हवामान खात्याने पुढील काही दिवसात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्याच्या संकट मागेच  

शिवाय जिल्ह्यात ढगाळ वातावरण देखील निर्माण झाले आहे. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील रब्बी ज्वारी, गहू व हरभरा पिक धोक्यात आली आहे. एकंदरीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT