Nandurbar News Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News: कापसाची आवक वाढली; नंदुरबार जिल्‍ह्यात ७५ हजार क्विंटल कापसाची खरेदी

कापसाची आवक वाढली; नंदुरबार जिल्‍ह्यात ७५ हजार क्विंटल कापसाची खरेदी

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी कापसाची आवक (Nandurbar News) चांगलीच वाढली आहे. यावर्षी मागील वर्षापेक्षा तुलनेत यावर्षी ३० ते ३५ टक्क्यांनी कापसाची (Cotton) आवक वाढली आहे. तर हंगाम अजूनही सुरू असल्याने आवक अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात मागच्या हंगामात आतापर्यंत कापसाने ५५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. मात्र यावर्षी आतापर्यंत ७५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. हा हंगाम अजून काही दिवस सुरू राहणार असल्याने कापसाची आवक मोठ्या प्रमाणावर येणार आहे. कापसाला सुरुवातीला बारा हजार पर्यंतच्या चांगला भाव मिळाला होता. मात्र नंतर कापसाच्या भाव घसरल्याने अनेक शेतकऱ्यांनी (farmer) कापूस घरातच साठवणूक करून ठेवला होता. परंतु हा कापूस आता विक्रीसाठी बाजार समिती त येत आहे. त्यामुळे यावर्षी विक्रमी आवक होण्याची शक्यता कृषी उत्पन्न बाजार समितीकडून वर्तवण्यात आलेली आहे.

यावर्षी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे काही प्रमाणावर कापसाच्या उत्पन्नात घट होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु आवक यावर्षी चांगलीच वाढली आहे. तर कापसाला सध्या समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT