Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News: एक लाख शेतकऱ्यांना मिळणार विम्याचा अग्रीम; आजपासून रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

Nandurbar News : विमा कंपन्यांनी अंशतः आक्षेप घेतले होते. यात नंदुरबार जिल्ह्यातील कंपनीने राज्य सचिवांकडे अपील केले होते

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली. नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी विमा कंपन्यांनी (Crop Insurance) भरपाई न देण्यासाठी राज्य शासनाकडे अपील दाखल केले होते. (Nandurbar) मात्र राज्य सरकारने विमा कंपन्यांचे अपील फेटाळल्याने शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यातील एक लाख ३५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानी संदर्भात राज्य शासनाने अधिसूचना काढली होती. या आधी सूचनेवर विमा कंपन्यांनी अंशतः आक्षेप घेतले होते. यात नंदुरबार जिल्ह्यातील कंपनीने राज्य (Farmer) सचिवांकडे अपील केले होते. अपीलवर सुनावणी करत सचिव यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला काही दुरस्त्या सुचवल्या होत्या. त्या दुरुस्त्या तातडीने पूर्ण करण्यात आल्यानंतर हे अपील निकाली निघाले आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२५ टक्के अग्रीम 

आता दिवाळीनंतर शेतकऱ्यांना आग्रिम रक्कम मिळण्यास प्रारंभ होणार आहे. एकीकडे विमाधारक शेतकऱ्यांना २५ अधिक खंड असलेल्या किंवा २१ महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या असल्याने येथील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. विमाधारकांना २५ टक्के आग्रीम रक्कम मिळणार आहे . त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकरांचा वीज अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT