Tomato Price Saam tv
ऍग्रो वन

Tomato Price : टोमॅटोचे दर शंभरीपार; बाजार समितीत आवक घातल्याचा परिणाम 

Nandurbar News : आठवड्याभरापूर्वी ३० ते ४० रुपये किलो प्रमाणे मिळणारा टोमॅटो आता ८० ते १०० रुपये किलोवर पोहोचला आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार :आठवडाभरापूर्वी ३० ते ४० रुपये किलो दराने मिळणारे टमाटे आता महाग झाले आहेत. बाजार समितीमध्ये रोजची होत असलेली आवक घातल्याने टोमॅटोच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या नंदुरबार बाजार समितीमध्ये टमाट्याचे दर ८० ते १०० रुपये प्रति किलोवर गेले आहेत.

नंदुरबार (Nandurbar) बाजार समितीत सद्यस्थितीत टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून आठवड्याभरापूर्वी ३० ते ४० रुपये किलो प्रमाणे मिळणारा टोमॅटो आता ८० ते १०० रुपये किलोवर पोहोचला आहे. यामुळे आता गृहिणींना स्वयंपाकातील टोमॅटो वापरावर अंकुश येणार आहे. आता तसेच जिल्ह्याभरात होत असलेल्या पावसामुळे आवक कमीच राहणार असल्याने येणाऱ्या दिवसात आणखीन भाव वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

उत्पादक शेतकऱ्यांना फायदा 

मागील काही दिवसांपासून (Bajar Samiti) पावसाची संततधार सुरु आहे. यात भाजीपाल्याची आवक देखील कमी आहे. दरम्यान आता टोमॅटोची आवक देखील घटल्याने भाव वाढले आहेत. यामुळे उत्पदक शेतकऱ्यांना भाव वाढीचा फायदा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

Muhurut Trading 2025 : शुभ मुहूर्तावर सेन्सेक्स-निफ्टीची सौम्य तेजी; कोणते शेअर्स चमकले?

Mumbai Crime News : मीरारोडमध्ये मोठा राडा! मुलीच्या छेडछाडीवरून दोन गटात हाणामारी; २० रिक्षांची तोडफोड

Kapoor Family: फॅम जॅम...! बॉलिवूडच्या कपूर खानादानाचा रॉयल दिवाळी फेस्ट लूक

Relationship Tips: सणासुदीला नवरा-बायकोमध्ये भांडणं का होतात? जाणून घ्या कारणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT