Nandurbar Saam tv
ऍग्रो वन

Photo: दारापुढे गारांचा पांढरा खच; शेतातील उभे पिक गेले वाया

दारापुढे गारांचा पांढरा खच; शेतातील उभे पिक गेले वाया

दिनू गावित

नंदुरबार : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यातल्या बऱ्याच भागात वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्‍या लहरीपणामुळे हिरावून घेतला आहे. (nandurbar news Hailstorm in front of the door The standing crop in the field is wasted)

यंदा बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांवर आसमानी व सुलतानी संकटात सुरूच आहे. अवकाळी पाऊस (Rain), थंडीमुळे पिकांना बसलेला फटका, गेल्या पंधरा दिवसांपासून उष्णतेत झालेली वाढ, तर दुसरीकडे विज बिल थकल्याने महावितरणकडून (MSEDCL) शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे वीज कनेक्शन कट करून वेठीस धरले जात आहे. अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना निसर्गाची दाहकता सुरूच आहे.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

जिल्ह्यातील शहादा (Shahada) तालुक्यात झालेल्या गारपीटीची भीषणता या दृष्यांकडे पाहून येते. सर्व कडे पसरलेली पांढरी चादर किती गारपीठ झाली हे सांगण्यास पुरेशी आहे. या झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. डोळ्यासमोर उध्वस्त होताना पाहून शेतकरी हताश झाले आहेत.

सातशे हेक्‍टर क्षेत्र अन्‌ दीड कोटीच नुकसान

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात गारपीटीसह झालेल्या अवकाळी पावसाने परिसरातील शेतकऱयांचे पपई, केळी, गहु, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जयनगर, वडाळी, बामखेडा, कोडावळ, खैरवे, बोराळे, निंभोरा अशा जवळपास ११ गावातील अकराशेहुन अधिक शेतकऱयांचे जवळपास सातशे हेक्टरवरिल पिकाच्या नुकसानीचा अंदाज वर्तवल्या जात आहे. हे नुकसान सव्वा ते दिड कोटीच्या आसपास असुन प्रशासन आणि कृषी विभागाने पाहणीसह पंचनाम्याला देखील सुरवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

SCROLL FOR NEXT