Farmer Success Story Saam tv
ऍग्रो वन

Farmer Success Story : काश्मीरच्या सफरचंदाची सातपुड्यात यशस्वी शेती; युट्युबवर बघून आदिवासी शेतकऱ्याने फुलवली बाग

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील बिजरी या गावात राहणाऱ्या एका आदिवासी शेतकऱ्याने युट्युबवर बघून चक्क सफरचंदाची बाग फुलवलेली आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : सफरचंद म्हटलं की आपल्याला जम्मू आणि काश्मीर आठवते. या राज्यात मोठ्या प्रमाणात सफरचंदाची शेती केली जाते. काश्मीरमधील थंड वातावरण सफरचंदासाठी पोषक असल्याने या ठिकाणी उत्तम दर्जाचे सफरचंद तयार केले जातात. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात उष्ण वातावरण असताना देखील सफरचंदाची शेती करणे अशक्य आहे. मात्र येथील आदिवासी शेतकऱ्याने ते शक्य करून दाखविले आहे. 

जम्मू- काश्मीर राज्यातील थंड प्रदेशात पिकवला जाणारा सफरचंद आता सातपुड्याच्या उष्ण भागात देखील पिकवला जातोय. नंदुरबार जिल्ह्यातील बिजरी या गावात राहणाऱ्या एका आदिवासी शेतकऱ्याने युट्युबवर बघून चक्क सफरचंदाची बाग फुलवलेली आहे. (Nandurbar) सातपुड्यातील बिजरी या गावात राहणार ५० वर्षीय आट्या पावरा या आदिवासी शेतकऱ्यांना युट्युब बघत असताना त्यांना उष्ण प्रदेशात विकल्या जाणाऱ्या सफरचंदाच्या फळाबद्दल माहिती मिळाली. युट्युबवर बघून त्यांनी सफरचंदाची शेती कशी केली जाते याबद्दल माहिती घेतली. ऑनलाइनच्या माध्यमातून राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात असणाऱ्या जय हिंद नर्सरीमधून सफरचंदाची ३  प्रकारचे रोपे मागवली आणि प्रयोग म्हणून त्यांनी सफरचंदाचे रोपे लागवड केली.

रासायनिक खतांचा वापर नाहीच 
आट्या पावरा या आदिवासी शेतकऱ्याने (Apple Farming) ऑनलाइनच्या माध्यमातून सफरचंदाचे तीन प्रकारचे रोपे मागवली. त्यात ६० रुपये पासून ते ३४० पर्यंतचे विविध प्रकारचे रोपे त्यांनी मागवले आणि लागवट केली. लागवड केलेल्या सफरचंदाच्या रोपाला त्यांनी कुठल्याही प्रकारचे कीटकनाशक किंवा रासायनिक खताचा वापर न करता युट्युबवर व्हिडिओ बघत पारंपारिक नैसर्गिक पद्धतीने गाईचे शेण आणि गुड यासोबतच बेसन पीठ वापरून खत तयार करून त्याचा वापर करण्यात आला.

यंदा करणार जास्त रोपांची लागवड 
शेतात लावलेल्या सफरचंदाच्या रोप १२ महिन्यानंतर मोठे झाल्यानंतर त्यांना फळ आले असून त्यांनी केलेल्या सफरचंदाच्या शेतीची जिल्हाभरात चांगलीच चर्चा होत आहे. त्यांनी ही सफरचंदाची शेती केली कशी? यासाठी इतर शेतकरी त्यांच्या शेतात जाऊन पाहणी करत आहेत आट्या पावरा यांनी प्राथमिक स्वरूपात केलेल्या या सफरचंदाच्या प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ते आता यावर्षी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात सफरचंदाची लागवड करणार असून यातून त्यांना येणाऱ्या काळात चांगलं उत्पन्न मिळणार असून हा नवीन प्रयोग सातपुड्याच्या आदिवासींसाठी एक नवीन राजमार्ग ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

Maharashtra Exit Polls : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll : शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचा विजय? पाहा Exit Poll

Murtijapur Exit Poll: मुर्तिजापूर मतदारसंघातून कोण निवडून येणार? हरिश पिंपळे की सम्राट डोंगरदिवे? पाहा एक्झिट पोल

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

SCROLL FOR NEXT