Tomato Price Saam tv
ऍग्रो वन

Tomato Price : टोमॅटोची लाली उतरली; दरात मोठी घसरण झाल्याने बळीराजाला फटका

Nanded News : मागील महिन्यांपूर्वी टोमॅटोचे दर वाढले असल्याने किरकोळ बाजारात टोमॅटो ३५ रुपयांच्यावर दराने विक्री केला जात होता. यामुळे गृहिणींच्या स्वयंपाक घरात टोमॅटोचा वापर कमी झाला होता

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : एकवेळ टोमॅटोचे दर वाढले होते. यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला होता. मात्र आता टोमॅटोचे दर आता खाली येत असल्याने टोमॅटोची लाली उतरल्याचे बोलले जात आहे. दरात घसरण होत असल्याने उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. दर निम्म्याहून कमी झाल्याने नागरिकांना मात्र दिलासा मिळाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

नांदेड जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असते. याठिकाणाहून शेतकरी टोमॅटोची वेगवेगळ्या बाजारपेठ मध्ये विक्रीसाठी नेत असतात. मागील महिन्यांपूर्वी टोमॅटोचे दर वाढले असल्याने किरकोळ बाजारात टोमॅटो ३५ रुपयांच्यावर दराने विक्री केला जात होता. यामुळे गृहिणींच्या स्वयंपाक घरात टोमॅटोचा वापर कमी झाला होता. तर दुसरीकडे उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्याने आर्थिक नफा चांगल्यापैकी मिळाला होता. 

निम्म्याहून दर झाले कमी 

नांदेड जिल्ह्यात सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कारण सध्या बाजापेठेत टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बाजारात टोमॅटोची अचानक आवक वाढल्यानं दरात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. किरकोळ बाजारात  साधारण ३० ते ३५ रूपये प्रतिकिलो दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचे दर आता थेट ८ ते १० रुपय किलोवर आले आहेत. तर होलसेल मार्केटमध्ये हे दर आणखी कमी झाले आहेत. 

शेतकरी संकटात 

टोमॅटोच्या दरात मागील कमी दिवसांपासून घसरण होत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. तर जिल्ह्यात टोमॅटोचे दर आणखी गडगडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आणखी आर्थिक फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. भाव अधिकच कमी झाल्यास फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

SCROLL FOR NEXT