Nanded News Saam tv
ऍग्रो वन

Nanded News : पत्नीचे दागिने मोडून खोदली विहीर; मनरेगा अंतर्गत विहिरीच्या अनुदानाची प्रतीक्षाच, शेतकऱ्यांनी दिला उपोषणाचा इशारा

Nanded : नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील शेतकऱ्यांनी हा इशारा दिला आहे. कारला येथील शेतकऱ्यांना मनरेगा रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०२३- २४ मध्ये सिंचन विहीरीना मंजुरी देण्यात आली होती

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर होत असतात. विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान देण्यात येत असते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर झाल्या असताना दोन वर्षांपासून यासाठीचे अनुदान मिळालेले नाही. यामुळे शेतकरी संतप्त झाले असून लवकर अनुदान न मिळाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. 

नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील शेतकऱ्यांनी हा इशारा दिला आहे. कारला येथील शेतकऱ्यांना मनरेगा रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०२३- २४ मध्ये सिंचन विहीरीना मंजुरी देण्यात आली होती. यासाठीची प्रशासकीय मान्यता देखील मिळाली. प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आज न उद्या यासाठीचे अनुदान मिळेल यातून शेतकऱ्याने विहीर खोदकाम करण्यास सुरवात केली. 

दागिने मोडून खोदली विहीर 

शेतकऱ्यांनी पत्नीच्या अंगावरील दाग दागिने मोडून आणि पैशांची उसनवारी करत खाजगी कर्ज काढले. या पैशांवर सिंचन विहिरीचे खोदकाम केले. विहिरीचे खोदकाम करून बांधकामही पूर्ण केले. मात्र शासनाच्या गलथान कारभारामुळे आणि अधिकाऱ्यांच्या चाल ढक्कल वृत्तीमुळे मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापपर्यंत अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. साधारण दोन वर्ष झाली तरी अनुदान मिळाले नाही. 

शेतकऱ्यांनी दिला उपोषणाचा इशारा 

अनुदानाची रक्कम खात्यात जमा व्हावी; यासाठी हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयाला अनेक वेळा या शेतकऱ्यांनी खेटे मारले. परंतु अद्याप पर्यंत अनुदानाची रक्कम काही मिळाली नाही. त्यामुळे वैतागलेल्या कारला या गावच्या शेतकऱ्यांनी अनुदानाची रक्कम खात्यात जमा करावी; अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT