Watermelon Farming Saam tv
ऍग्रो वन

Watermelon Farming : टरबुजाच्या शेतीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न; बाजारात मागणी वाढली

Nanded News : शेतकऱ्यांनी देखील पारंपरिक शेती सोबतच फळबाग लागवडीकडे वळावे; असे आवाहन टरबुज उत्पादक शेतकरी प्रवीण देशमुख यांनी केले आहे.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : प्रामुख्याने उन्हाळ्यात टरबूज व टांगरचे उत्पादन घेतले जात असते. यांची मागणी देखील मोठ्या प्रमाणात होत असते. पाऊले काही (Farmer) शेतकरी टरबूज व टांगर लागवड करून उत्पादन घेत असतात. (Nanded) अशाच प्रकारे नांदेड जिल्ह्यातील पारडी या गावातील शेतकऱ्याने टरबूज शेतीतून लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. (Latest Marathi News)

सध्या उन्हाळा सुरू झाला असून (Watermelon) टरबुजाला मोठी मागणी होऊ लागली आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पारडी गावातील प्रवीण देशमुख या शेतकऱ्याने आपल्या सात एकर शेतीमध्ये टरबुजाची लागवड केली. प्रवीण देशमुख यांनी आपल्या शेतात टरबुज लागवडीचा हा यशस्वी प्रयोग केला. इतर शेतकऱ्यांनी देखील पारंपरिक शेती सोबतच फळबाग लागवडीकडे वळावे; असे आवाहन टरबुज उत्पादक शेतकरी प्रवीण देशमुख यांनी केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

३० लाखाचे उत्पन्न अपेक्षित 

सात एकरमध्ये लागवड केलेल्या टरबुजाची तोडणीला आता सुरवात झाली आहे. या सात एकर क्षेत्रात टरबूज लागवडीचा लागलेला खर्च वगळता ३० लाखांचे उत्पन्न देशमुख यांना अपेक्षित आहे. सध्या तर्बुजला चांगला भाव मिळत असल्याने यातून मिळणार नफा देखील चांगला मिळत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT