नांदेड जिल्ह्यात यंदा सर्वाधिक पिकांचे नुकसान Saam Tv
ऍग्रो वन

नांदेड जिल्ह्यात यंदा सर्वाधिक पिकांचे नुकसान

या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

संतोष जोशी

नांदेड - राज्यात यंदा सर्वाधिक पाऊस Rain कोकणात झाला. मात्र, नांदेड Nanded जिल्ह्यातील खरिप पिकांचे Crop मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यात यंदा दोन वेळेस अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील ८० हजार हेक्टर वरील खरीप पिकांच नुकसान Crop Damage झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

हे देखील पहा -

दरवर्षी आतापर्यंत पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत यंदा दुप्पट पाऊस झाला आहे. काही मंडळात तर एका दिवसात २०० - २०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकं पाण्याखाली गेली होती. या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वत्र नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.

लवकरच नुकसानीच्या पंचनाम्याचा अंतिम अहवाल येणार आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्यात गेल्यानं आता शेतकरी शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहे. या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT