मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय इमारत (Mumbai Agricultural Produce Market Committee) विकास मिरगणे
ऍग्रो वन

Mumbai: बाजार समितीचा मोठा निर्णय; अनधिकृत व्यापार करणाऱ्यांवर APMC कारवाई करणार

Mumbai Agricultural Produce Market Committee: गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब पाटलांसह एकूण सात लोकांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.

विकास मिरगणे

मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (Mumbai Agricultural Produce Market Committee) बाहेर घाऊक व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आता एपीएमसी (AMPC) प्रशासन कारवाई करणार आहे. यासाठी समिती नियुक्त करण्यात आली असून, ही समिती प्रतिमाह एपीएमसी (APMC) प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईचा आढावा घेणार आहे. राज्य सरकारकडून पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत असणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब पाटलांसह एकूण सात लोकांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. (Big decision of Mumbai Agricultural Produce Market Committee; APMC will take action against unauthorized traders)

हे देखील पहा -

संबंधित समिती एपीएमसीमार्फत परिसरातील कोल्ड स्टोरेज वेअर हाऊस (Cold Storage Warehouse) आणि मुंबईसह परिसरात सुरु असलेला बेकायदेशीर उपबाजारांवर कारवाई करणार आहे. त्याबाबतचा आढावा आता दर महिन्याला गठीत केलेली समिती घेणार आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरात इराणी सफरचंद अफगाणिस्तानमार्फत आणून इराणी आणि अफगाणिस्तानी व्यापारी कोल्ड स्टोरेजमधून बेकायदा व्यवसाय करत होते. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. असे व्यवसाय नियमनमुक्ती झाल्यापासून फोफावला असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT