BMC Budget: मुंबई महापालिकेचा 2022-23 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी सादर होणार

BMC Budget 2022-23: २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात १६.७४ टक्केची वाढ करून ३९ हजार ०३८ कोटी रुपयांचा आजवरचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.
BMC Budget 2022-23
BMC Budget 2022-23Saam Tv

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात बीएमसीचा (BMC) २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारीला महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल हे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे सादर करणार आहेतय २०१९-२०२० या आर्थिक वर्षाकरीता अर्थसंकल्प (Budget) मांडताना ३३४४१.०२ कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. तर गेल्या वर्षी म्हणजेच २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात १६.७४ टक्केची वाढ करून ३९ हजार ०३८ कोटी रुपयांचा आजवरचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. (Mumbai Municipal Corporation's budget for the financial year 2022-23 will be presented on Thursday)

हे देखील पहा -

अर्थसंकल्पात नव्याने तरतूद कशासाठी असेल ?

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात साथजन्य आजारांसाठी विशेष रुग्णालये उभारणे.

- नद्यांचे शुद्धीकरण आणि सौंदर्यीकरण, मिठी नदीमध्ये बोटिंग.

- सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या नव्या शाळा उभारणे.

- कचर्‍याची विल्हेवाट आणि कचर्‍यापासून वीज प्रकल्प.

- पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना, पर्यावण संवर्धन उपक्रम.

- पुलांच्या मजबुतीसाठी, नवीन पुलांसाठी विशेष निधी, सीसीटीव्ही कॅमेरे.

अर्थसंकल्पात मुंबईकरांना दिलासादायक काय असेल?

काही दिवसांपूर्वीच पालिकेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. दर पाच वर्षांनी वाढणारा ८% मालमत्ता करही पालिकेने (BMC) माफ केला आहे. याशिवाय मुंबईकरांवर यावर्षीही कोणतीही करवाढ लादली जाणार नाही असं म्हटलं जातंय.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात आरोग्य यंत्रणेबाबत सतर्क राहायला हवंय. हे महापालिकेला कळून चुकलंय. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य व्यवस्थेसाठी भरीव तरतूद असण्याची शक्यता आहे. यामध्ये आरोग्य सुविधांचे अद्ययावतीकरण, विस्तारासह विकासाला गती देण्यात येऊ शकते. दूरदृष्टी राखून आरोग्य यंत्रणे बाबत घोषणा होऊ शकते.

BMC Budget 2022-23
Video: राज्यात हिवाळी अधिवेशन आजपासून, विविध मुद्यांवर आज वादळी चर्चा

जुन्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद

मुंबई महापालिकेने अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. यामध्ये कोस्टल रोड, पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा गोरेगाव- मुलुंड लिंक रोड, समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पांसाठी आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोठी तरतूद होण्याची शक्यता आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com