महावितरणला शेतकऱ्यांनी सुचना देऊनही वायर बदलले नाही; 4 एक्कर ऊस जळून खाक! दीपक क्षीरसागर
ऍग्रो वन

महावितरणला शेतकऱ्यांनी सुचना देऊनही वायर बदलले नाही; 4 एक्कर ऊस जळून खाक!

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

दीपक क्षीरसागर

लातुर: जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील राचन्नावाडी येथे विद्युत तारेचे घर्षण होऊन बाबुराव संभाजी नंदगावे यांचा अडीच एकर व बबन माधवराव चिंचोळे यांचा दिड एकर असा एकूण चार एकर ऊस महावितरणच्या निष्काळजीपणामुळे जळून खाक झाला आहे.

बाबुराव नंदगावे यांचा या अगोदरही विद्युत तारांचा स्पार्क होउन तिन एकर ऊस जळाला होता. त्यावेळी हाळी येथील उप अभियंता भुजबळे यांनी स्थळ पंचनामा करून शेतकऱ्यांना शेतातील खाली लोंबत असलेले तार ओढुन घेऊन दुरूस्त करण्याचे अश्वासन दिले होते. मात्र, दोन वर्षे झाले शेतकऱ्यांना फक्त आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.

याविषयी, नंदगावे यांनी महावितरण विरोधात या अगोदर ऊस जळाल्याने तक्रार दाखल केली आहे. याचे प्रकरण न्यायालयात आजही सुरूच आहे. पहिले जळालेल्या ऊसाचा निकाल लागण्यापूर्वीच यावर्षीही नंदगावे यांचा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे अडीच एकर ऊस व शेती उपयोगी साहित्य जळून चार लाख पंन्नास रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती ज्ञानोबा नंदगावे यांनी दिली आहे.

तरी यासंदर्भात त्यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, महावितरण कार्यकारी अभियंता, शिरूर ताजबंद यांना ऊस महावितरणमुळे जळाली असल्याची लेखी तक्रार केली आहे. तर बबन चिंचोळे यांचा दिड एकर ऊस व शेती उपयोगी साहित्य जळून दोन लाखांचे नुकसान झाले आहे, असे एकुण सरसरी सहा लाख पंन्नास हजाराचे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाले आहे.

हे देखील पहा-

नंदगावे यांच्या शेतीतून डिपीकडे गेलेल्या विद्युत तारा एवड्या खाली आहेत की, त्या शेतातून व्यक्ती जात असेल तर त्या विद्यूत तारा डोक्याला सहज लागत आहेत. तरी याविषयी महावितरणशी कळवूनही या घटनेकडे गांभीर्याने घेतले नसल्याने व हयगय केल्यामुळे पुन्हा विद्युत तारा स्पार्क होऊन सहा एकर ऊस जळाला आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT