अंबरनाथमध्ये अज्ञात इसमाची गळा चिरून हत्या!

अंबरनाथमध्ये एका अज्ञात इसमाचा गळा चिरलेला मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
अंबरनाथमध्ये अज्ञात इसमाची गळा चिरून हत्या!
अंबरनाथमध्ये अज्ञात इसमाची गळा चिरून हत्या!अजय दुधाने
Published On

अजय दुधाने

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका अज्ञात इसमाचा गळा चिरलेला मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अंबरनाथमधील बदलापूर रोडवरील चिखलोली परिसरात एका मोकळ्या जागेत आज सकाळी हा मृतदेह आढळून आला होता. माहितीनुसार, मयत इसमाचे वय (30 ते 35) वर्षांच्या दरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तो व्यक्ती याच परिसरात काम करणारा कामगार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. रात्रीच्या सुमारास त्याची हत्या झाल्याचा अंदाज आहे. सध्या त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांकडून सुरु आहेत. (Ambernath Crime News)

अंबरनाथमध्ये अज्ञात इसमाची गळा चिरून हत्या!
अमरावती: पैसे भरले नाही म्हणून परीक्षेचा पेपर हिसकावला, विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या!

तरुणाची ओळख पटवण्याचे प्रयत्न;

काल गुरुवार रात्रीच्या सुमारास तरुणाची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मृत तरुण 30 ते 35 वर्ष या वयोगटातील असल्याचा अंदाज आहे. तो याच परिसरात काम करणारा कामगार असल्याची शक्यता आहे.

या इसमाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर, अंबरनाथ पश्चिम पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com