Chandrapur, pravin somankar saam tv
ऍग्रो वन

Success Story : नाेकरी मिळाली नाही...जिद्दीने दूसरा मार्ग शाेधला... युवक महिन्याला पन्नास हजार रुपये कमाविताे

फळबाग लागवडीतून देखील युवकाने समृद्धी साधली आहे.

संजय तुमराम

Success Story : चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातल्या चेक हत्तीबोडी येथील युवा शेतक-याने शासकीय योजनेचा लाभ घेऊन स्वत:च्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून पारंपरिक शेतीचा कायापालट करण्याची कल्पकता दाखविली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील धान या पारंपरिक उत्पादनाला फाटा देऊन तो 'धनाकडे' वळल्याने त्याच्या यशाचे सर्वत्र काैतुक (Monday Motivation) हाेत आहे. (chandrapur latest marathi news)

पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी (तुकूम) येथील रहिवासी असलेल्या प्रवीण बुधाजी सोमनकर (Pravin Somankar) या युवकाची चेक हत्तीबोडी येथे साडेसात एकर शेती आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या प्रवीणला केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) भरतीने हुलकावणी दिली. त्यानंतर तो थेट शेतीकडे (farming) वळला. (Maharashtra News)

कृषी विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत त्याला शेततळ्यासाठी 2017 मध्ये त्याला पन्नास हजार रुपयांचे अनुदान मिळाले. यातून शेततळे पूर्ण करून त्यात प्रवीणने स्व:खर्चाने मत्स्यबीज सोडण्याचा निर्णय घेतला. यात ग्रासकर्प, सिरपन, रोहू, कटला या माशांच्या प्रजातींचा समावेश आहे. अर्धा ते पाऊण किलोचे मासे झाले की प्रवीण त्याची विक्री करतो. मागच्याच महिन्यात त्याने पन्नास हजार रुपयांची मासेविक्री केली. (Tajya Batmya)

विविध फळ झाडांची लागवड

आजघडीला त्याच्या शेतात आंब्याची दशहरी, लंगडा, हापूस, केशर या प्रजातींची साडे झाडे, पेरू, सीताफळ आणि फणसची प्रत्येकी दहा झाडे आहेत. त्याने निलगीरीसुध्दा स्व:खर्चाने लावली आहे. गतवर्षी प्रवीणला (youth) दाेन लाखांचे उत्पन्न झाले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT