संजय राठोड
यवतमाळ - यावर्षी जिल्ह्यात शेकडो शेतकऱ्यांना प्रथम,दुबार तिबार पेरणीने कंबरडे मोडले. त्यातच अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना सहन करावा लागत असल्याने शेतकरी दिवसं दिवस कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. त्यामुळे आत्महत्याचे सत्र जिल्ह्यात सुरूच आहे. आर्णी तालुक्यातील अंबोडा येथील अल्पभूधारक शेतकरी (Farmer) विकास देविदास राठोड वय ३२ या युवा शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जामुळे गळफास लावून आत्माहत्या केल्याची घटना घडली आहे.
हे देखील पहा -
आभाळभर संकटाचं गाठोडं ऊरावर घेऊन जागाचा पोशिंदा सतत काळ्यामातीत राबत असतो. विकास राठोड नामक या शेतकऱ्याने पत्नी आणि दोन चिमुकल्याचा आयुष्याचा विचार न करता जिवनयात्रा संपविली. मृतक विकास राठोड कडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. यावर्षी त्याला नापिकीला समोर जावावं लागलं. कर्ज आणि सततची नाफिकीला कंटाळून विकास ने आपली जिवनयात्रा संपवली त्यामुळे त्यांचा कुटूंब उघड्यावर आला आहे.
जगातील साऱ्या वेदना आमच्या कपाळी कोरल्या की,काय अशी भावाविभोट भावना शेतकरी मायबापाची झाली आहे.आपण इतके कष्ट उपसले,शेतामध्ये घाम गाळून रक्त आठवले.पण मुला बाळांच्या भविष्यातील अंधार पुसून टाकता आला नाही, याचे शल्य शेतकऱ्यांच्या मेंदूला डागण्या देत असेल तर नवल वाटण्याचे कारण नाही. एरवी वारा,वादळ,विंचुकाटा उषाला घेऊन झोपणारा शेतकरी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या चक्रव्यूहात अडकला आहे. चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने कागदी घोडे न नाचवता मानसिक आणि आर्थिक मदत तातडीने देण्याची गरज आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.