Latur News Saam Tv
ऍग्रो वन

Latur: मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस; लाखो हेक्टरवरील पिके गेली वाहून

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

दीपक क्षीरसागर

लातूर - जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर लातूर (Latur) जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील औसा आणि निलंगा तालुक्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. दरम्यान, या पावसामुळं शेतकऱ्यांना (Farmer) मोठा फटका बसला आहे.

मागील दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा जिल्हाभरात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. औसा आणि निलंगा तालुक्यातील काही ठिकाणी कमी वेळात तुफान पावसाची नोंद झाली आहे. औसा तालुक्यातील अपचुंदा, तपसेचिंचोली, लामजना, मंगरुळ शिवारात कमी कालावधीत तुफान पाऊस (Rain) झाला आहे. तर निलंगा तालुक्यातील शेडोळ शिवारात अतिवृष्टी झाली आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, या मुसळधार पावसामुळं शेडोळ आणि लामजना शिवारात सर्वाधिक नुकसान झालं आहे. या भागातील ओढ्यांना आणि नाल्यांना पूर आला आहे. या भागातील अंतर्गत रस्त्यावर असणारे छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत.

आपचुंदा, तपसेचिंचोली, लामजना, मंगरुळ, शेडोळ आणि लामजना या भागातील शिवारात असणारं सोयाबीन पिकाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. येथील अनेक शिवारात पाणीच पाणी झाले आहे. पाण्यात बुडल्यामुळं सोयाबीनचे पीकही हाताचे गेले आहे. काही भागात जमीन खरवडून गेल्या आहेत. त्यामुळं पीकही गेले आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT