Organic Papaya Farming Saam tv
ऍग्रो वन

Organic Papaya Farming: उच्चशिक्षित शेतकऱ्याची सेंद्रिय पद्धतीने पपईची शेती; रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारले गोमूत्र

Maval News : नोकरी करण्यापेक्षा आपल्या चार एकर शेतामधील दहा गुंठ्यात त्याने पपई या पिकाचे उत्पादन घेण्याचं ठरवलं.

दिलीप कांबळे

मावळ : खेड तालुक्यातील चिंबळी गावातील एका उच्चशिक्षित शेतकऱ्याने सेंद्रिय पद्धतीने पपईची शेती केली. (Maval) पिकही तितकेच जोमात आले असून उत्पादन देखील चांगले मिळण्याची आशा या तरुण (Farmer) शेतकऱ्याला आहे. (Maharashtra News)

प्रतीक जाधव असे या उच्चशिक्षित तरुणाचे नाव (Khed) आहे. नोकरी करण्यापेक्षा आपल्या चार एकर शेतामधील दहा गुंठ्यात त्याने पपई या पिकाचे उत्पादन घेण्याचं ठरवलं. दहा गुंठे शेतात त्याने तैवान ७८६ या वाणाची दीडशे पपई रोपे चाकणच्या (Organic farming) एका नर्सरीमधून आणून लागवड केली. सर्वप्रथम पपईसाठी त्याने जमीन नांगरणी करून नऊफूट बाय पाचफूट या अंतरावर बेड तयार करून त्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंड, ट्रायकोड्रमा, खते वापरली. ठिबकसिंचनचा वापर सर्व रोपांना पाण्याची व्यवस्था केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पपईच्या झाडावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये; यासाठी गिर गाईचे गोमूत्र, निबोली अर्क, दशपर्णी अर्क, जीवामृतचा वापर करण्यात आला. ही पपई शेंद्रीय पद्धतीने केल्यामुळे याची चव खूपच गोड आहे. आत्तापर्यंत पपईचे सोळा तोडे काढले असून दोन हजार चारशे किलो माल काढला आहे. शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना वापरल्याने अनेक सोसायटीमध्ये या पपईला मोठी मागणी आहे. सध्या प्रति किलो साठ रुपये भाव मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT