lampy Virus
lampy Virus saam tv
ऍग्रो वन

Maval: लम्पी स्किनचा मावळातही शिरकाव; २० जनावरांना लागण, तीन मृत्यू...

दिलीप कांबळे

मावळ - मधील उर्से गावातील वीस जनावरांना लम्पी स्किन (Lampi Disease) विषाणूची लागण झाली आहे. तर तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूचा बाह्य कीटकांद्वारे प्रसार होतो. त्यामुळे शासन नियमानुसार पाच आणि दहा किलोमीटरच्या परिसरातील जनावरांच्या लसीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या विषाणूची लागण झाल्याने जनावरांना ताप येऊन दूध उत्पादन घटण्याची शक्यता असते. जनावरे चाराह खात नाही आशा जनावरांना तापाची औषध देने व लसीकरण करणे आवश्यक आहे.

हे देखील पाहा -

मावळ मध्ये बावन्न हजार पशुधन आहे. गाय बैल यांचं पंचवीस हजार तर म्हैस वर्गात सव्वीस हजार पशुधन आहे. याचा उर्से गावात जास्त रोग जाणवलं. जनावरांचे लसीकरण केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांत त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. हा प्रभाव वर्षभर टिकून राहतो असे डॉक्टरांनी सांगितले.

नवलाख उंब्रे, जाधववाडी, मेंढेवडी, या गावात लक्ष जास्त दिले आहे. आतापर्यंत चार हजार आठशे त्रेंशी पूर्ण केले आहे. लम्पिस्किन विषाणू या रोगाची बाधा गाय व म्हैस वर्गातील सर्व वयोगटाच्या जनावरांना होते. वासरांमध्ये रोगाची तीव्रता अधिक दिसते. त्यामुळे रोगी जनावरे अधिक अशक्त होतात. मात्र जनावरांमध्ये लक्षणे आणि आजार आढळून आल्यास शेतकऱ्यांनी घाबरून न जाता योग्य ते उपचार आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

SCROLL FOR NEXT