nashik, satana, farmers, rasta roko andolan saam tv
ऍग्रो वन

Onion : कांद्याच्या दरासाठी सटाण्यात 'महाविकास' चा रास्ताे राेकाे; संगमनेरला शेतक-याने पिकावर फिरवला ट्रॅक्टर

कांद्याला दर मिळावा यासाठी राज्यभरातील शेतकरी मागणी करु लागले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- अजय साेनवणे, सचिन बनसाेडे

Nashik : कांद्याच्या दरात (onion price) सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरी (farmers) हवालदिल झाला आहे. कांदा प्रश्नावर नाशिकच्या (nashik) सटाणा (satana) येथे महाविकास आघाडीतर्फे (mva) सटाणा - मालेगाव रस्त्यावर बाजार समिती समोर रस्त्यावर कांदा ओतत रास्ता रोको आंदोलन (rasta roko andolan) करण्यात आले.

कांद्याला ५०० रुपये अनुदान मिळावे, निर्यात खुली करावी या मागण्यांकडे केंद्र सरकार व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीतील शिवसेना,कॉंग्रेस,राष्ट्रवादीचे पदाधिकारी व शेतकरी या रास्ता राेकाे आंदाेलनात माेठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कांदा पिकावर शेतक-याने ट्रॅक्टर फिरवला

कांद्याची आवक वाढल्याने दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संगमनेर तालुक्यातील पिंपरने येथील शेतकरी धनंजय थोरात यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात लागवड केलेल्या कांदा पिकावर अक्षरशः ट्रॅक्टर फिरवला. (Breaking Marathi News)

धनंजय थोरात यांनी या कांदा पिकासाठी आतापर्यंत जवळपास दोन लाख रुपये खर्च केला होता. मात्र कांदा काढणीला आला असतानाच अचानक कांद्याचे भाव कोसळले. खर्चही निघणार नसल्याने हवालदिल झालेल्या थोरात यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात काढणीला आलेल्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवला.

फुकट कांदा नेण्यासाठी उडाली झुंबड

कोणीही या, मोफत कांदा उपटून घेऊन जा आणि रान मोकळे करून द्या अशी म्हणण्याची नामुष्की या शेतकऱ्यावर ओढवली आहे. त्यामुळे थोरात यांच्या शेतात कांद्याची पात खाण्यासाठी शेळ्या-मेंढ्या आणि कांदा नेण्यासाठी माणसांची झुंबड उडाली होती. एरव्ही गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा भाव कोसळल्याने आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतोय.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळांच्या विजयाचा मोठा जल्लोष; जेसीबीतून फुलांचा वर्षाव

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT