उल्हासनगरात सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; आत्माहत्या केल्याचं उघड Saam Tv
ऍग्रो वन

शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; NRBच्या अहवालात माहिती उघड

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा (Farmer Suicide) आकडा आता अधिक चिंताजनक होत चालला आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं एनआरबीच्या अहवालातून समोर आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या केव्हा थांबतील, असा प्रश्न पडला आहे. कृषिप्रधान महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा आपल्या राज्याची मान शरमेने खाली घालवणारा आहे. कारण शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या आकडेवारीत आपला महाराष्ट्र टॉपवर आहे. देशात नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच एनसीआरबीने सादर केलेल्या अहवालानुसार २०२० या वर्षात देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या तब्बल १८ टक्क्यांनी आत्महत्या वाढल्या आहेत. यातही गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

एकट्या महाराष्ट्रात ४ हजार ६ आत्महत्या झाल्यात. त्यामुळे २०१९, त्यानंतर २०२० मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्रच आघाडीवर आहे. आणि आता २०२१ या वर्षातील १० महिन्यात आत्महत्येचा आकडा भयावह आहे. देशात वेगवेगळ्या कारणामुळे ज्या आत्महत्या होतात, त्यात ७ टक्के आत्महत्या शेतकऱ्यांच्या आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या २८ रोजी भारतात झालेल्या आत्महत्यांवरील आकडेवारी जाहीर केली आहे. यावरुन शेतकरी आणि शेतमजूर यांच्या आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत आहेत.

देशात

२०१६ मध्ये एकूण ११ हजार ३७९ शेतकरी आणि शेतमजूरांनी आत्महत्या केली.

२०१७ मध्ये ती १० हजार ६५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होत्या.

२०१८ मध्ये १० हजार ३४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

२०१९ मध्ये अशा एकूण १० हजार २८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

२०२० मध्ये आत्महत्या प्रकरणांची संख्या १० हजार ६७७ एवढी होती.

२०२१ या या वर्षातील आकडा त्यापेक्षा जास्त असल्यानं देशाची चिंता वाढलीय..

महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षात एकापाठोपाठ एक आपत्ती येत गेल्या कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी कधी गारपीट यामुळे दरवर्षी शेतकरी आर्थिक संकटात सापडत गेला त्याला उभारण्यासाठी सरकारच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना आणि कर्जमाफी जाहीर करण्यात आली पण त्याचा परिणाम फारसा झाला नाही. राज्यात या वर्षी पुन्हा अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. आता राज्य सरकारकडून मदत दिली जाणार आहे, पण त्या आर्थिक मदतीने शेतकरी उभा कसा राहील असा प्रश्न आहे. देशात महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. प्रगतीचे अनेक शिखरे पादाक्रांत करताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी रोखणार यांचं उत्तर कधी मिळणार असा प्रश्न आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT