Maharashtra Rain  Saam Tv
ऍग्रो वन

अवकाळी पावसाची वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी; आंबा बागांना फटका

असानी चक्रीवादळाने महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिंधुदुर्ग: देशात पूर्व किनारपट्टीवर धडकणाऱ्या असानी चक्रीवादळाने (Hurricane) महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्र (Maharashtra), कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बारामतीमध्ये देखील वादळी वाऱ्याबरोबरच विजांच्या कडकडाट बरोबरच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. हवामान खात्याकडून पाऊस (rain) पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अवकाळी पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची (farmers) मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली आहे. वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत.

हे देखील पाहा-

राज्यातील नागरिक उकाड्यापासून हैराण झाले आहेत. परंतु या उकाड्यादरम्यान हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. काही तासांसाठी वातवारणात गारवा राहील. परंतु शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांना फटका बसला आहे. तसेच पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बारामतीमध्ये २० ते ३० मिनिटे विजांच्या कडाक्यासह पाऊस पडला. काही काळ धो-धो पाऊस पडल्यानंतर विश्रांती घेतली आहे.

वादळी वारे आणि विजांसह काही ठिकाणी मध्यम पाऊस, तुरळक ठिकाणी मुसळधार सरी शक्य: पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्याच्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

अंबोलीमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अल्हाददायक क्षण अनुभवला आहे. दाट धुके आणि धो-धो बरसणाऱ्या पावसादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उकाड्यातून गारवा जाणवला. घाटात काही प्रवाशांनी थांबून या क्षणाचा आनंद घेतला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Young adults lifestyle: शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या तरूणांना या आजाराचा धोका; संशोधनातून धक्कादायक बाब समोर

EPFO Update: EPFO कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ६० वर्षानंतर PFच्या नियमात मोठे बदल

Maharashtra News Live Update: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ४ आरोपींना दिलासा

Singer Trolled for Live Performance: प्रसिद्ध गायिकेचे लाईव्ह कॉन्सर्टवेळी अश्लील चाळे; स्टेजवरील कृत्याने चाहते संतापले, VIDEO

Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची, अडचणींवर मात करत केली MPSC क्रॅक; सोलापूरच्या शेतकऱ्याची लेक झाली सरकारी अधिकारी

SCROLL FOR NEXT