सरकारचा निषेध म्हणून शेतकऱ्याने फुकट वाटली मिर्ची
सरकारचा निषेध म्हणून शेतकऱ्याने फुकट वाटली मिर्ची  Saam Tv
ऍग्रो वन

सरकारचा निषेध म्हणून शेतकऱ्याने फुकट वाटली मिर्ची

मंगेश कचरे

पुणे: पाच लाख खर्च करुन जोपसलेल्या ढोबळी मिरचीचा पहिला तोडा विक्रीसाठी आणल्यानंतर प्रति किलोला दोन रुपये देखील दर न मिळाल्याने उद्विग्न झालेल्या शेतकरी पिता पुत्रांनी फुकट मिरची वाटली. उरलेली पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर फेकून दिली. इंदापूर तालुक्यातील वडापूरी गावचे शेतकरी खंडू राजगुरु यांनी तीन महिन्यांपूर्वी तीन एकर क्षेत्रात ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले. त्याला पाच लाख रुपये खर्च आला.

मिरचीचा पहिला तोडा विक्रीसाठी त्यांनी रविवारच्या आठवडा बाजारात आणला होता. मात्र प्रतिकिलोस दोन रुपये देखील दर मिळाला नाही. त्यामुळे उद्विग्न झालेल्या खंडू राजगुरु व त्यांचा मुलगा नवनाथ या दोघांनी ढोबळी मिरचीने भरलेले वाहन शहरातील बाबा चौकात आणले. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मधोमध उभा करुन ये जा करणारांना ढोबळी मिरची फुकट वाटली.उरलेली मिरची रस्त्यावर फेकून दिली.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Tips: गुंतवणूक करताना 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Waris Pathan : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट ; वारीस पठाण निवडणुकीच्या रिंगणात, लढत तिरंगी होणार

Sambhajinagar News : शैक्षणिक वर्ष आटोपले तरीही शिष्यवृत्ती अर्जाचा तिढा कायम; १० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित

Buldhana DJ Banned News : बुलढाणा जिल्ह्यात DJ वाजवण्यास बंदी, 22 डीजेवर पोलिसांकडून कारवाई

वर्ल्डकप संघात स्थान मिळताच स्टार खेळाडूची सुपरफ्लॉप कामगिरी!ठरला राजस्थानच्या पराभवाचं कारण

SCROLL FOR NEXT