loss of strawberry, Nanded, unseasonal rain
loss of strawberry, Nanded, unseasonal rain Saam Tv
ऍग्रो वन

Loss of Strawberry : शेतक-याचा स्वप्नांचा झाला चिखल, जिद्दीने पिकवलेली लाल चुटुक स्ट्रॉबेरी मातीमाेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- संजय सूर्यवंशी

Nanded Unseasonal Rain: अस्मानी संकटामुळे एका युवा शेतकऱ्याच्या (farmer) स्वप्नावर पाणी फिरलं आहे. युवा शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीचा (strawberry) मराठवाड्यात (marathwada) यशस्वी प्रयोग केला खरा पण नुकताच झालेल्या अवकाळी पावसाने (unseasonal rain) तसेच गारपिटीने शेतकऱ्याच्या स्ट्रॉबेरीचा लाल चिखल झाला आहे. यामुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत गेला आहे. (Maharashtra News)

स्ट्रॉबेरी म्हंटल की आपल्याला आठवते महाबळेश्वरची (mahableshwar) शेती. पण मराठवाड्या सारख्या उष्ण प्रदेशात देखील स्ट्रॉबेरीच पीक घेतलं जाऊ शकतं हे नांदेड जिल्ह्यात युवा शेतक-याने करुन दाखवलं. बारड इथल्या बालाजी उपवाऱ या युवा शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग केला.

चार महिन्यांपूर्वी या युवा शेतकऱ्याने आपल्या शेतात नेदरलँडच्या स्ट्रॉबेरीच पीक घेतलं. यातून चांगले आर्थिक उत्पन्न होईल अशी स्वप्न देखील या युवा शेतकऱ्याने पाहिली. पण अवकाळी आणि गारपिटीने बालाजी याच्या स्वप्नांवर पाणी फिरले.

त्याच स्ट्रॉबेरीच हे पीक या वादळी वाऱ्याच्या आणि गारपिटीच्या तडाख्यात वाचू शकलं नाही. अक्षरशः या स्ट्रॉबेरीचा लाल चिखल झालाय. मागील दोन महिन्यांपासून या स्ट्रॉबेरीतून उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली होती. उन्हाची चाहूल लागताच या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी पिकाला यातून वाचवण्यासाठी ग्रीन शेड उभारला होता.

या वादळी वाऱ्यामुळे ग्रीन शेड सोबत स्ट्रॉबेरी पिकाचे नुकसान झाले. जवळपास लागवडी पासून आतापर्यंत अडीच लाख रुपये खर्च आला. खर्च जाऊन 2 ते 3 लाख रुपये उत्पनाची अपेक्षा होती. परंतु या अस्मानी संकटाने होत्याच नव्हतं झालं असे बालाजी उपवार आणि मारोती अप्पा उपवार यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

SCROLL FOR NEXT