विनोद जिरे
बीड - जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभरा पीक घेतले जाते. या पिकावर खरिपाची पेरणी करता येईल म्हणून शेतकरी घरामध्ये हरभरा ठेवतात आणि शासकीय हमी भाव केंद्रावर खरेदी सुरू झाल्यानंतर तो विकला जातो. मात्र यावर्षी शासकीय हमी केंद्रावर, ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत फक्त दोनच दिवस दिल्याने हरभरा उत्पादक सर्व शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करता आली नाही. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचा हरभरा घरात पडून आहे. Loot from traders in gram purchase
खासगी व्यापाऱ्यांकडून हरभरा खरेदी करताना, शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचे चित्र बीडमध्ये आहे. हमी भावाप्रमाणे हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये भाव आहे. मात्र खाजगी व्यापारी हा हरभरा ४ हजार रुपये क्विंटलने खरेदी करत असल्यामुळे, शेतकऱ्यांना तब्बल अकराशे रुपयांचा फटका बसला आहे. यामुळे मुख्यमंत्री साहेब तात्काळ हरभरा खरेदी केंद्र सुरु करा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
हे देखील पहा -
मागच्या वर्षी रब्बी हंगामामध्ये, बीड जिल्ह्यात ३० ते ३५ हजार हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली होती. बहुतांश शेतकऱ्यांना हरभरा पीक भरभरून झाले. मात्र आज हरभरा घरात असताना, शासकीय हमीभाव केंद्र सुरू नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे साठवणूक करण्यासाठी जागा नसल्याने, अक्षरशः हरभऱ्याच्या घुगऱ्या होत आहेत. तसेच कीड लागण्याची शक्यता देखील आहे. Loot from traders in gram purchase
शेतकरी पेरणीच्या वेळी हरभरा हमी भावाने खरेदी करणाऱ्या, शासकीय खरेदी केंद्रावर तो विक्री करण्यासाठी घेऊन जातो. मात्र या वर्षी दोन दिवस ऑनलाईन करण्याची मुदत असल्यामुळे १५ ते २० टक्के शेतकऱ्यांचा हरभरा शासकीय हमी भावाने खरेदी केला गेला. तर ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांचा हरभरा आज देखील घरांमध्ये पडून आहे. त्यामुळे एफ.सी.आर.ए कडून केली जाणारी खरेदी पुन्हा सुरू करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील नंदलाल चव्हाण या शेतकऱ्याकडे आज वीस क्विंटल हरभरा पडून आहे. अशीच काही परिस्थिती बीड तालुक्यातील वडवाडी गावातील अभिमान अवचार या शेतकऱ्याची आहे. परिसरातील अनेक शेतकरी एकत्रित येऊन, अभिमान आवचार यांच्याकडे हरभरा साठवणूक करतात. हमीभावाची खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर, हा हरभरा विकला जातो. मात्र यावर्षी दोनच दिवस ऑनलाइन नोंदणी करण्याची मुदत दिल्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाने हरभरा खरेदी विक्री करता आलेला नाही.Loot from traders in gram purchase
महा एपीसी मार्फत शेतकरी कंपन्याना हरभरा खरेदी केंद्र दिले. मात्र ऑनलाइन करता आले नाही, म्हणून आज हरभरा पडून आहे. अगोदरच लॉकडाऊनने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना, शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मुख्यमंत्री साहेब यांनी या शेतकऱ्यांच्या अडचण सोडवावी व शासकीय हमीभाव खरेदी केंद्र याची मुदत वाढ करून, खरेदी करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. दरम्यान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी शेतकऱ्यांचा हरभरा हमीभावाने खरेदी करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.