Latur: पीकविमा कंपनीचे शटर किसान सेनेने केले डाऊन Saam TV
ऍग्रो वन

Latur: पीकविमा कंपनीचे शटर किसान सेनेने केले डाऊन

दिपक क्षीरसागर

लातूर जिल्ह्यातील (Latur District) प्रत्येक गावात ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांनाच पीकविम्याची (Crop Insurance) रक्कम अदा करून ५ लाखांवर शेतकऱ्यांना वंचित ठेवल्याप्रकरणी किसान सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि., च्या लातूर येथील कार्यालयाचे शटर डाऊन केले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी टाळे लावून काढता पाय घेतल्याचे किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळगे यांनी सांगितले, गेल्या हंगामात खरीप पिके फुलाऱ्यात असताना पावसाने उघड दिली. उत्पन्नात ५० टक्के घट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के अगाऊ भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीला दिले.

कंपनीने ९ मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के अगाऊ भरपाई मंजूर केली. त्यात जळकोट तालुक्यातील २ मंडळ, चाकूर ४, अहमदपूर २, लातूर १ मंडळांचा समावेश आहे. जिल्ह्यात पावसाने २२ दिवस उघड दिली. पिके फुलात असताना पावसाने ओढ दिल्याने उत्पन्नात मोठी घट आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना कंपनीने भरपाईसाठी ९ मंडळांची निवड कोणत्या निकषाने केली. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्याने वैयक्तिक नुकसानासंदर्भात ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज केले, अशा ५ लाख ८ हजार ६५० शेतकऱ्यांना वैयक्तिक नुकसानीपोटी हेक्टरी १० ते १२ हजार रुपये दिले. नुकसानीची रक्कम मंजूर करताना कंपनीने पंचनामे न करता सरसकट रक्कम मंजूर केली.

नदीकाठच्या शेतकऱ्यांना पूर्ण संरक्षित रक्कम मिळायला पाहिजे. त्यांनाही १० ते १७ हजार रुपये दिले. ज्या शेतकऱ्यांनी मुदतीत अर्ज केले नाही म्हणून कंपनीने भरपाई देणे टाळले. विमा कंपनीने एन. डी. आर. एफ. च्या बेसीसवर शासनाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून सरसकट भरपाई द्यावी. अन्यथा विमा कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे, रेणापूर तालुकाध्यक्ष परमेश्वर माने यांनी दिला होता. त्यानुसार आज पोलीस अधीक्षकांना कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन दिले व त्यानंतर विमा कंपनीच्या कार्यालयात जावून विचारणा केली. मात्र त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने कार्यालयाचे शटर खाली ओढले असता कर्मचाऱ्यांनी स्वतःहून कुलूप लावले व तेथून काढता पाय घेतला, असे गजानन बोळंगे यांनी सांगतले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Israel - Hezbollah War : हिजबोल्ला-इस्त्राइलमध्ये युद्ध पेटलं, स्पेशल रिपोर्ट

Maharashtra News Live Updates : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

Shambhuraj Desai on Dhangar Reservation : धनगर आरक्षणासंदर्भात शंभुराज देसाईंची महत्वाची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT