पावसाअभावी शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता  भूषण अहिरे
ऍग्रो वन

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता

शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींकडून दुष्काळ जाहीर करण्याची होत आहे मागणी

भूषण अहिरे

धुळे - जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी पाऊस Rain झाल्याने धुळे Dhule जिल्ह्यामधील प्रकल्पांमध्ये जलसाठा कमी आहे. ऑगस्ट महिना अर्धा संपला परंतु अद्यापही धुळे जिल्ह्यात समाधानकारक असा दमदार पाऊस झाला नाही. धुळे शहरात भर पावसाळ्यात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे . नकाणे, डेडरगाव, अक्कलपाडा या जलस्त्रोतांमध्ये पूर्णपणे पाण्याची पातळी घटली आहे. समाधानकारक पाऊस झाला नाही तर भविष्यात धुळेकरांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. त्याच बरोबर दुबार पेरणी करून देखील पिकाला Crop पाऊस नसल्यामुळे येणाऱ्या पिकातून देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांना Farmer घट सहन करावी लागणार आहे.

यामुळे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तालुकानिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारकडे दुष्काळा संदर्भात अहवाल सादर करण्यासंदर्भात भेट घेतली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिना निम्म्याहून अधिक उलटला तरी देखील दमदार पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केलेल्या पिकाला देखील वाचवण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. त्यातच जेमतेम जगवलेलं पीक टिकलं तरी त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट शेतकऱ्यांना सहन करावी लागणार आहे.

हे देखील पहा -

त्यामुळे शेतकऱ्यांकडून देखील दुष्काळ जाहीर करून प्रतिहेक्‍टरी दमदार मदत राज्य सरकारने जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम सरासरी क्षेत्र 4.16 लाख हॅक्तर पैकी 3.99 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. म्हणजेच जिल्ह्यात एकूण 96% पेरणी पूर्ण झाली आहे.

धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलाव मध्ये सध्या 30 टक्के इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. तापी योजनेतून धुळे शहरातील निम्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. व निम्या शहराला नाकाने त्याचबरोबर डेडरगाव,अक्कलपाडा या प्रकल्पांमधून पाणी पुरवठा केला जातो. परंतु या प्रकल्पांमधील पाणीसाठा देखील कमी झाल्यामुळे आगामी काळात धुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड पाणीटंचाई उद्भवणार अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यामध्ये देखील अजुनही समाधानकारक दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. पेरणीनंतर पाऊस लांबल्याने अनेकांना दुबार पेरणी करावी लागली त्या नंतर पाऊस झाला. पण तोही पुरेसा नसल्याने शेतकरी राजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 12 मध्यम प्रकल्प असून 47 लघु प्रकल्प आहे.

परंतु समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या 23 टक्के इतकाच जलसाठा सर्व प्रकल्पांमध्ये उरला आहे. पुढील काळात अशीच परिस्थिती राहिली तर मात्र धुळेकरांना कोरडा दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळेच धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली असून दुष्काळासंदर्भात तालुकानिहाय अहवाल प्रशासनातर्फे राज्य सरकारला पाठविण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्यांना राज्य शासनातर्फे मदत जाहीर करण्यास मदत होईल अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्याकडे केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: दसऱ्याला बुध-गुरूची युती होणार, ३ राशींवर परिणाम, खिशात राहणार पैसाच पैसा

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, तरुणीला रस्त्यावर लाथांनी बेदम मारहाण | VIDEO

Zubeen Garg Death Case : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; मॅनेजर अन् महोत्सव आयोजकाला अटक

Facebook New Feature: सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी खुशखबर! फेसबुकच्या नव्या फीचरने वाढेल कमाई

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

SCROLL FOR NEXT