Kalyan Crime Saam tv
ऍग्रो वन

Kalyan Crime : शेतीच्या वादातून कुटुंबाला मारहाण; शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, तिघेजण ताब्यात

Kalyan News : वादात बाळाराम टोके त्यांची मुले इतर सहा ते सात जणांनी बनकरे कुटुंबियांना दांडके आणि रॉडने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: शेतीचा वाद उफाळून आल्याने या वादातून एका गटाकडून शेतकरी कुटुंबांला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना (Kalyan) कल्याण तालुक्यातील रुंदे आंबवली गावात घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेले शेतकरी चांगदेव बनकर यांचा उपचारादरम्यान (Death) मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. (Breaking Marathi News)

कल्याण तालुक्यातील रुंदे आंबिवली गावात चांगदेव बनकरे, पत्नी व दोन मुलांसह राहत होते. त्यांची दोन मुले दुग्ध व्यवसाय आणि शेती करतात. यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. ५ एप्रिलला चांगदेव बँकरे यांची पत्नी उषाबाई बनकरे शेतात असताना त्यांचे नातेवाईक बाळाराम टोके यांनी आमच्या शेतीत तू काय करते तू इथून निघून जा असे सांगितले. उषाबाईने घडला प्रकार तिच्या मुलांसह पतीला सांगितला. यानंतर (Farmer) चांगदेव आणि त्यांचे कुटुंबीय बाळारामला जाब विचारण्यासाठी गेले असता चांगदेव आणि बाळाराम यांच्यात वाद झाला. या वादात बाळाराम टोके त्यांची मुले इतर सहा ते सात जणांनी बनकरे कुटुंबियांना दांडके आणि रॉडने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या मारहाणीत चांगदेव बनकरे त्यांची पत्नी उषाबाई आणि दोन मुले तसेच काका जखमी झाले. यानंतर चांगदेव यांना गंभीर अवस्थेत टिटवाळा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी (Police) आधी दोन जणांना अटक केली होती. मात्र चांगदेव बनकरे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मात्र या प्रकरणात नऊ आरोपी असून सर्व आरोपींना जोपर्यंत अटक करीत नाही. तोपर्यंत चांगदेव यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. सदर प्रकरणात सागर टोके, अमित टोके आणि प्रल्हाद टोके यांना अटक केली आहे. अन्य सहा आरोपींना अटकेचे आश्वासन पोलिसांनी दिल्यावर चांगदेव कुटुंबियांना मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेनेचे रवींद्र धंगेकर देणार उद्या जैन बोर्डिंगला भेट

इतिहास, साहस आणि पर्यटनाचा संगम; रायगड किल्ल्यावर पर्यटकांचा उत्साह ओसंडला|VIDEO

Shocking : धक्कादायक! खेळताना छतावरून कोसळला; लोखंडी सळई थेट पोटातून आरपार, ५ वर्षीय मुलाची प्रकृती नाजूक

Brain Tumor: 'ही' लक्षणं साधी नसून असू शकतात ब्रेन ट्युमरचे संकेत

Amruta Khanvilkar Photos: ओठावर लाली अन् दिसायला भारी, अमृताचे फोटो पाहून तरूण घायाळ

SCROLL FOR NEXT