Cauliflower Price Saam tv
ऍग्रो वन

Cauliflower Price : भाज्यांचे दर गडगडले; भाव नसल्याने फुलकोबीच्या पिकात सोडल्या मेंढ्या

Jalna News : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील वडोद तांगडा येथील ही घटना असून शेतीमालाला योग्य बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याच चित्र पाहायला मिळत आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे घाऊक बाजारासह किरकोळ बाजारात भाज्यांचे दर पडले आहेत. जवळपास सर्वच भाज्यांचे दर पडले आहेत. यात फुल कोबीला देखील योग्य बाजार भाव मिळत नसल्याने तोडणी करून ती परवडत नाही. यामुळे शेतकऱ्याने फुलकोबीच्या पिकात मेंढ्या सोडल्या आहेत. 

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील वडोद तांगडा येथील ही घटना असून शेतीमालाला योग्य बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याच चित्र पाहायला मिळत आहे. वडोद तांगडा येथील शेतकरी माणिक तांगडे यांनी आपल्या दीड एकर शेतात फुलकोबी पिकाची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी सुमारे ७५ हजार रुपयांचा खर्च केला होता. आता फुलकोबी काढणीवर आली आहे. मात्र भाव नसल्याचे चित्र सध्या बाजारात पाहण्यास मिळत आहे. 

फुलकोबीची आवक वाढली 

शेतकरी माणिक तांगडे यांनी केलेल्या मेहनतीनंतर फुलकोबीचे पीकही चांगले आले. मात्र, बाजारात अचानक फुलकोबीची आवक वाढली. परिणामी फुलकोबीचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे, शेतकरी माणिक तांगडे यांनी आपल्या फुलकोबीवर केलेला खर्चही निघत नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले असून त्यांनी आपल्या दीड एकर शेतात फुलकोबीचे नुकसान करण्यासाठी चक्क मेंढ्या सोडल्या आहेत. 

भाजीपाला उत्पादक आर्थिक संकटात 

शेतीमालाला योग्य बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत असतो. सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी भाजीपाल्यांचे दर देखील घसरले आहेत. भाजीपाल्याचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी फायद्याचे ठरत आहेत. मात्र भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, शेती मालाला योग्य बाजारभाव उपलब्ध करून देण्याचीही या शेतकऱ्याने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WiFi Internet Tips : फक्त १ काम करा, घरातलं वायफाय धावेल बुलेटच्या स्पीडनं!

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून शहरात नाकाबंदी!

Vande Bharat Train : झणझणीत मिसळ अन् चविष्ट पुरणपोळी, आता वंदे भारतमध्ये मराठमोळं जेवण

Early cancer symptoms: कॅन्सरचा धोका कसा ओळखाल? ही ८ लक्षणं वारंवार देतात संकेत, दुर्लक्ष करू नका!

Nidhhi Agerwal : संतापजनक! धक्काबुक्की अन् गैरवर्तन केले; अभिनेत्रीला चाहत्यांकडून वाईट वागणूक, VIDEO पाहून राग अनावर होईल

SCROLL FOR NEXT