Mosambi Price Saam tv
ऍग्रो वन

Mosambi Price : मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात; झाडाखाली पडतोय फळांचा सडा, दारातही मोठी घसरण

Jalna News : मोसंबीवर रोग पडल्याने फळ खाली गाळून पडत आहे. तर दुसरीकडे परराज्यात पाऊस सुरू असल्याने मोसंबीच्या दरात मोठी घसरण झाल्याने आठवड्याभरात दर निम्म्याने कमी झाले आहेत.

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: सध्या मोसंबी उत्पादक शेतकरी फळगळतीमुळे हवालदिल झाला आहे. फळ परिपक्व होण्यापूर्वीच गाळून पडत असल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर दुसरीकडे काढणी केल्यानंतर मोसंबी विक्रीसाठी मार्केटमध्ये नेली असता त्याला चांगला दर देखील मिळत नसल्याने शेतकरीसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.  

जालन्यातील घनसावंगी, जालना यासह जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने मोसंबी पिकाची जोपासना केली. मात्र ऐन मोसंबीला फळ लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात फळगळती होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी मोसंबी फळगळतीमुळे चिंताग्रस्त झाला असून अनेक वर्षापासून जोपासलेल्या फळबागांवर फळगळतीचे मोठे संकट ओढावले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. 

मोसंबीच्या दरातही मोठी घसरण 

देशभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असल्याने मोसंबीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड परिसरातील मोसंबी उत्पादक शेतकरी हतबल झाले. आठवडाभरातच अर्ध्यापेक्षा कमी भाव झाल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. त्यात मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना एका टनामागे तब्बल दहा ते १५ हजार रुपये आर्थिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. 

शेतकऱ्यांना मोठा फटका 

एकीकडे वातावरणातील बदलासह मोसंबीच्या फळावर बुरशीजन्य मगरी रोग पडल्याने मोसंबीला गळती लागली असताना दुसरीकडे बाजारात मोसंबीचे दर मोठ्या प्रमाणावर पडले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या पाचोड येथील मोसंबीच्या बाजारपेठेत आवक वाढली. मात्र परराज्यात पाऊस सुरू असल्याने मोसंबीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आठवड्याभरात मोसंबीचे दर २० हजारांहून १० हजारांवर आल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना एका टना मागे तब्बल दहा हजार रुपये आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola : धक्कादायक प्रकार; अकोला शासकीय रुग्णालय आवारातील लॉनवर अश्लील चाळे

दिवाळीच्या तोंडावर सोनं महागलं, १० तोळं सोन्यासाठी किती मोजावे लागणार? पाहा लेटेस्ट दर

Shocking: इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून २ मित्रांनी उडी मारली, सामूहिक आत्महत्येने खळबळ; नेमकं काय घडलं?

शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी मदत, दुपारी फडणवीस करणार मोठी घोषणा?

Ahaan Panday : 'सैयारा'नंतर अहान पांडेला मोठ्या चित्रपटाची लॉटरी, 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स?

SCROLL FOR NEXT