Jalna News  Saam tv
ऍग्रो वन

Jalna News : जालना जिल्ह्यात केवळ २८ टक्के क्षेत्रावरील ई- पीक पाहणी; नोंदणीसाठी १५ सप्टेंबरपर्यत मुदत

Jalna News : ई- पीक पाहणी नोंदणी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने करावयाची होती. परंतु मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान झाली असल्याने ई- पीक पाहणी कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 

जालना : शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करण्यासाठी ई- पीक पाहणी नोंदणी करण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. अर्थात यात नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यालाच नुकसान भरपाईचा लाभ मिळू शकणार आहे. दरम्यान जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचा ई-पीक पाहणी नोंदणीला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत असून आतापर्यंत केवळ २८ टक्के क्षेत्रावरील पिक पाहणी पूर्ण झाली आहे.

ई- पीक पाहणी नोंदणी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने करावयाची होती. परंतु मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान झाली असल्याने ई- पीक पाहणी कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. काही शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नसल्याने अशा शेतकऱ्यांना ॲपमध्ये नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत फक्त २८ टक्के क्षेत्रावरील नोंदणी पुर्ण झाली आहे.

१५ सप्टेंबरपर्यंत मुदत 

जालना जिल्ह्यातून ई- पीक नोंदणीसाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी आसल्याचे पाहण्यास मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी नोंदणी करण्याची आणखी संधी असून शेतकऱ्यांना पिकाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी शासनाकडून १५ सप्टेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT