Parola News Saam tv
ऍग्रो वन

Parola News : कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याने संपविले जीवन

Jalgaon News : टोळी शिवारातील स्वतःच्या शेत आहे. शेतीसाठी त्यांनी बँक व विकास सोसायटीकडून कर्ज घेतले होते.

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : डोक्यावर कर्जाचा बोजा असताना शेतातून अपेक्षित उत्पन्न आले नाही. यामुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत पारोळा तालुक्यातील टोळी येथील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले. शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. 

पारोळा (Parola News) तालुक्यातील टोळी येथील शेतकरी विजय रामचंद्र पाटील (वय ३६) असे मयत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. माजी सरपंच स्वाती विजय पाटील यांचे पती होत. दरम्यान विजय पाटील यांचे टोळी शिवारातील स्वतःच्या शेत आहे. शेतीसाठी त्यांनी बँक व विकास सोसायटीकडून कर्ज घेतले (Farmer) होते. मात्र शेतातून अपेक्षित उत्पन्न न आल्याने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते; यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले. 

विजय पाटील १७ नोव्हेंबरला शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी त्यांना पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान आज सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : विरारमध्ये राडा, डहाणूत पक्षप्रवेश; मतदानापूर्वी बविआ उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश, VIDEO

Maharashtra News Live Updates: बविआचे आमदार क्षितिज ठाकूर यांविरोधात गुन्हा दाखल

Vinod Tawde: भाजप नेत्यानं टीप दिल्याचा हितेंद्र ठाकूर यांचा दावा; विनोद तावडे म्हणाले, कारमध्ये काय चर्चा झाली मलाच माहिती

Devendra Fadnavis : विनोद तावडेंनी पैसे वाटले नसून त्यांचावरच हल्ला झालाय; विरार प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Election : मोदीजी, हे ५ कोटी कुणाच्या 'सेफ'मधून निघाले? राहुल गांधींच्या प्रश्नावर विनोद तावडे म्हणाले, तुम्ही स्वतः नालासोपाऱ्यात या!

SCROLL FOR NEXT