Parola News Saam tv
ऍग्रो वन

Parola News : शेतातील पिके करपली; तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन

Jalgaon News :शेतातील पिके करपली; तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : पाऊस नसल्याने शेतात पिकविलेल्या पिकांना कसे वाचवायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. याच (Jalgaon) कारणाने विवंचनेतुन त्रस्त झालेल्या पिंपळकोठा येथील तरुण शेतकऱ्याने (Farmer) फवारणीचे औषध घेऊन जीवनयात्रा संपविली. (Maharashtra News)

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने (Rain) दडी मारली आहे. यामुळे पाण्याअभावी पिके सुकू लागली आहेत. यातूनच पारोळा तालुक्यातील पिंपळकोठा येथील मोहन शंकर राठोड (वय २२) हा शुक्रवारी (१ सप्टेंबर) फवारणीसाठी गेला असता, त्याने पिकांची स्थिती पाहून फोनवर शेतातील पिके करपल्याचे सांगितले. यानंतर त्याने विषारी द्रव प्रश्न केले. 

फोनवरच सांगितले 

शेतातील पिके करपल्याचे सांगतांना कपाशीवर फवारणीसाठी आणलेले विषारी औषध पिऊन घेतले, तुम्ही शेतात या; असे त्याने फोनवरच सांगितले. हे ऐकून नातेवाइकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मोहनला उपचारासाठी खासगी वाहनाने कुटीर रुग्णालय येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT