Jalgaon News Farmer Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News: तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; साडेतीन लाखांच्या सावकारी कर्जाने घेतला जीव

तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; साडेतीन लाखांच्या सावकारी कर्जाने घेतला जीव

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जरंडी (ता. सोयगाव) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने (Farmer) साडेतीन लाखांच्या सावकारी कर्जाला कंटाळून आत्महत्य केली. दीपक जनार्दन सुस्ते (वय ३२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. (Letest Marathi News)

जरंडीत दीपक सुस्ते पत्नी स्वाती, मुलगी प्रांजल (८), मुलगा पीयूष (वय अडीच) यांच्यासह वास्तव्यास होते. दीपक यांच्या वाट्याला दीड एकर शेती आली होती. पती- पत्नी दोघेही शेतात राबराब राबत होते. मोसंबी आणि कापसाचा (Cotton) पेरा केला. मात्र, लहरी निसर्गाच्या कोपामुळे पीक येऊ शकले नाही. पेरणी, फवारणी, मजुरी, कीटकनाशके, कुटुंबाचे आजारपण, अशा वेगवेगळ्या (Jalgaon) कारणाने दीपक यांनी खासगी सावकाराकडून वेळोवेळी घेतलेले कर्ज साडेतीन लाख रुपये झाले होते. स्वतःचे शेत करून दीपक शेजारीच दुसऱ्या शेतातही मजुरी करू लागला. सावकाराचा पैशांसाठी लावलेला तगादा आणि शेतजमीन जाण्याच्या दडपणाखाली असलेल्या दीपक सुस्ते यांनी गुरुवारी (ता. १) दुपारी मृत्यूला कवटाळले.

फवारणीचे औषध पिले

दीपक गुरुवारी सकाळी लवकरच शेतात गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास फवारणी करताना, दीपक फवारणीचे द्रावण पिऊन घेतले. त्यामुळे ग्लानी येऊन पडल्यावर शेतात सोबत काम करणाऱ्यांनी आरडाओरड केल्यावर शेजारील शेतकरी आणि ग्रामस्थांनी त्याला उचलून जळगावच्या दिशेने धाव घेतली. जिल्‍हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यावर उपचारादरम्यान दीपकची प्राणज्योत मालवली. तोपर्यंत त्याची पत्नी स्वाती आणि इतर नातेवात्तकांनी जळगाव गाठले. मृत्यूचे कळताच त्यांनी एकच हंबरडा फोडत आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

SCROLL FOR NEXT