Farmer Suicide Saam tv
ऍग्रो वन

कर्जबाजारी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

कर्जबाजारी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

तोंडापूर (जळगाव) : तोंडापूर (ता. जामनेर) परिसरातील तोंडापूर व कुंभारी खुर्द येथील शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक दोन (Jamner) दिवसात घटना घडली आहे. (jalgaon news tondapur Debt ridden farmers commit suicide)

तोंडापूर येथील शेतकरी (Farmer) विनोद एकनाथ काकर (वय ३८) यांनी शेतीच्या मशागतीसाठी व विविध कार्यकारी सोसायटीतून कर्ज काढले होते. शेतात माल न झाल्याने डोक्यावर कर्ज असल्यामुळे नैराश्य येवून त्‍यांनी राहत्या घरात सोमवारी विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या (Farmer Suicide) केली. त्यांना एक मुलगा, पत्नी आहे. औषधी पिल्याने त्यांना जळगाव येथे उपचारासाठी नेले असता डॉक्‍टरांनी त्‍यांना मृत्य घोषित केले.

वडाळी शिवारातही आत्‍महत्‍या

तर १ जूनला कुंभारी खुर्द येथील शेतकरी बळीराम नथु चव्हाण (वय ४९) यांनी स्वतःच्या मालकीच्या वडाळी शिवारातील शेतात विषारी औषधी पिवुन आत्महत्या केली. त्यांना तात्काळ जळगाव येथील सरकारी दवाखान्यात (Hospital) दाखल करण्यात आले असता डॉक्‍टरांनी त्‍यांना मृत्य घोषित केले. त्‍यांच्‍या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. तोंडापूरसह परिसरात दोन गावातील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेले दोन्ही तरूण असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदरच्या घटनेची नोंद जळगाव येथील सरकारी दवाखान्यात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसाला मारहाण, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कॉलर पकडून ओढत नेलं अन्...

Akola Accident : अकोल्यात अपघाताची मालिका सुरूच, 2 दिवसात तिघांचा मृत्यू तर दोन जखमी

Maharashtra Live News Update: आरक्षणाच्या लढाईनंतर मनोज जरांगे नारायण गडावर

Bads Of Bollywood: शाहरुख खानपासून ते करण जोहरपर्यंत; आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणार फिल्म इंडस्ट्रीचा खरा चेहरा

जुना वाद टोकाला; व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, गोळ्या झाडून संपवलं, मास्टरमाईंडसह ६ जण ताब्यात

SCROLL FOR NEXT