Heavy Rain Saam tv
ऍग्रो वन

अस्मानी संकट..रावेर तालुक्यावर तिसऱ्यांदा वादळी पावसाचा तडाखा

अस्मानी संकट..रावेर तालुक्यावर तिसऱ्यांदा वादळी पावसाचा तडाखा

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : रावेर तालुक्यात पुन्‍हा वादळी पावसाने तडाखा दिला. गेल्‍या दोन आठवड्यात तालुक्‍यावर तिसऱ्यांदा अस्मानी संकट कोसळले आहे. शनिवारी (ता. ११) सायंकाळी विजांच्या कडकडाटात जोरदार (Rain) पाऊस झाला. मात्र तालुक्यातील पुनखेडा, खिरवड या भागात मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा तडाख्यामुळे केळी पीक आडवे होऊन शेतकऱ्यांचे (Farmer) मोठे नुकसान झाले आहे. (jalgaon news third time heavy rain hit Raver taluka)

शनिवारी दुपारी साडेचार ते साडेपाच दरम्यान रावेर (Raver) शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात वाऱ्यासह एक तास मुसळधार पाऊस पडला. तालुक्यातील पुनखेडा, पातोंडी, खिरवड शेती शिवारातील केळी पीक जमीनदोस्त होऊन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, रावेर, पुनखेडा, पातोंडीदरम्यान अनेक वृक्ष उन्मळून पडल्यामुळे वाहतूक सेवा खंडित झाली आहे, तर अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्यामुळे वीजसेवा खंडित झाली आहे. रावेर शहरातील काही भागांत विजेच्या तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.

तीस हजार केळीची खोडे आडवी

पुनखेडा, पातोंडी, खिरवड, अजंदा या पट्ट्यात केळीचे मोठे नुकसान झाले आहे. अखिल भारतीय केळी (Banana) उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील यांच्या पातोंडी आणि अजंदा रस्त्यावरील शेतातील सुमारे ३० हजार केळीची खोडे आडवी झाली आहेत. या शिवाय नारायण धनगर, भगवान बोरसे, विलास बोरसे, जगन्नाथ बोरसे, समाधान पाचपोळे, लक्ष्मण सावळे, स्वप्नील सावळे, अशोक पाटील, हरीश पाटील, डॉ.गुलाब पाटील, विनोद पाटील, हिंमतराव पाटील, विजय पाटील, बिजलाल लवंगे, पंकज सपकाळे आदींचेही मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT